मोरेश्वर भोंडवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी, दि. २०(Pragat Bharat )– पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी जेष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भोंडवे यांना नियुक्तीचे पत्र आज सायंकाळी मुंबई येथे मंत्रालयात देण्यात आले.यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक मयूर कलाटे तसेच उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणूक विचारात घेऊन मोठ्या प्रमाणात दिग्गज आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कार्यकारणीवर संधी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. शहरातील सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व नवीन कार्यकारणीत असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरात अत्यंत मोठा जनसंपर्क तसेच दानशूर नेता म्हणून ख्याती असलेले मोरेश्वर भोंडवे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धूरा सोपविल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असेही ते म्हणाले.
मोरेश्वर भोंडवे हे रावेत परिसरातून तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. २०१४ मध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी केली होती. चिंचवड विधानसभा मतदगारसंघातून आगामी काळात विरोधकांना तोडीस तोड उमेदवार असावा म्हणून भोंडवे हे तयारी करत आहेत. त्या अर्थाने त्यांना कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे.

Related posts