Ratnagiri Gas And Power Private Limited Facing Trouble No Power Production Last 9 Months Likely Plant Shutdown

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ratnagiri RGPL News:  RGPPL अर्थात रत्नागिरी गॅस पॉवर प्रायव्हेट लिमिटेडची (RGPL) देशातील मोठा गॅस आधारीत वीज निर्मिती करणारा प्रकल्प, अशी ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) गुहागर (Guhagar) तालुक्यात हा प्रकल्प आहे. युती सरकारच्या काळातील हा प्रकल्प अधिक चर्चेत होता. कोकणातील एन्रॉनचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची दुसरी ओळख आहे. देशातील सर्वात मोठा गॅस प्रकल्प असलेल्या या एन्रॉन प्रकल्पाला आता शेवटची घरघर लागली आहे. जवळपास मागील नऊ महिन्यांपासून वीज निर्मिती ठप्प आहे. 

या प्रकल्पातून होणाऱ्या वीज निर्मितीला खरेदीदार नसल्यानं RGPPL कंपनीला वर्षाला 400 कोटी रूपयांहून अधिकचा तोटा होत आहे. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याने RGPPL प्रकल्प बंद होण्याची भीती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी व्यक्त केली आहे. RGPPL मध्ये सध्या उत्पादनापेक्षा मशिन्स मेंटेनन्स अधिक आहे. त्या तुलनेनं उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत. दरम्यान, या साऱ्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून कंपनीकडून वीज निर्मिती बंद आहे. कधीही विजेची मागणी आल्यास कंपनी पूर्ण क्षमतेने वीज देईल, असा प्रशासनाचा दावा आहे. त्याच अनुषंगाने जून महिन्यात एका दिवसात 1350 मेगावॉट वीज निर्मिती करून नॅशनल ग्रीडला एक डेमो देखील देण्यात आला होता. पण, सद्यस्थिती कायम राहिल्यास तसेच केंद्र किंवा राज्य सरकारनं लक्ष न दिल्यास ही कंपनी बंद होऊ शकते अशी भीती कंपनीच्या सीईओंनी व्यक्त केली आहे. 

रोजगारावर गदा 

कंपनी बंद झाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. यापूर्वी जवळपास 400 कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. या साऱ्या प्रकरणात खासदार सुनील तटकरे यांनी काही प्रयत्न केले होते. पण, त्याला यश काही आलेले दिसून येत नाही. राज्याचे उद्योगमंत्री असलेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. 

थोडक्यात प्रकल्पाचा इतिहास

युती सरकारच्या काळात गाजलेला प्रकल्प म्हणजे गुहागर तालुक्यातील दाभोळ – अंजनवेलमधील एन्रॉनचा प्रकल्प.विरोधात असताना शिवसेना – भाजपनं स्थानिकांना साथ देत या प्रकल्पाला विरोध दर्शवला. पण, 1995 नंतर मात्र या वीज प्रकल्पाचं घोडं गंगेत न्हालं. जवळपास 1071 एकरवर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातून हजारो जणांना रोजगार मिळणार होता. 1995 नंतर हा प्रकल्प सुरू झाला तरी 2001 नंतर मात्र वीज खरेदीदार नसल्यानं प्रकल्पाला घरघर लागली. 1967 मेगावॅट वीज निर्मितीच्या या प्रकल्पाला होणाऱ्या गॅसच्या पुरवठ्याचा दर, प्रति युनिट विजेचा असलेला जास्त दर यामुळे सारं गणित कोलमंडलं. आजघडीला देखील या ठिकाणी होणारी वीज निर्मिती मे 2022 पासून बंद आहे.

[ad_2]

Related posts