वास्तूदोष दूर करणाऱ्या कापराचे झाडही असते, तुम्हाला माहितीये का? घरातल्या कुंडीतही येते लावता| Vastu Tips How To Grow Camphor Trees and know the uses

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Camphor Benefits in Marathi: आपल्या देव्हाऱ्यात हमखास कापूर आढळतो. पूजा करताना कापूर जाळणे शुभ समजले जाते. पण तुम्हाला माहितीये का कापूर कुठून येतो? कापराचे झाड असते पण हे झाड घरात लावता येते का? त्याचे काय फायदे मिळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊया. 

सध्या पुजेसाठी लागणारा कापूर बाजारात सहज उपलब्ध होतो. मात्र या कापूरमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स आढळले जातात. केमिकल्स असलेल्या कापूरमधील औषधी गुण फारच कमी असतात. त्यामुळं नैसर्गिकरित्या कापूरमध्ये खूपच आयुर्वैदिक गुणधर्म असतात. कापूर एका मोठ्या झाडापासून मिळवला जातो. पिंपळ, वडाप्रमाणेच कापराचे झाड ही विशाल आणि सदाबहार असते. 

कापराची झाडे मोठ्या प्रमाणात भारत,श्रीलंका, चीन, जपान, मलेशिया, कोरिया, तैवान, इंडोनेशिया सारख्या देशात आढळले जातात. या झाडांची उंची 50 ते 100 फूट असते. याचे फूल, फळ आणि पाने या आकर्षक असतात. अनेकजण सजावटीसाठीही घरात हे झाड लावतात. वसंत ऋतुमध्ये या झाडांची छोटी-छोट्या फुल बहरतात. त्याचबरोबर या झाडांची फळे मन आकर्षित करतात. 

कापराचे झाडाचे खोड फर्निचरसाठीही वापरले जातात. हे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. या झाडाचे लाकूड छोट्या-छोट्या भागात कापून पाण्यात उकळले जाते. त्यानंतर वाफ आणि थंड झालेल्या लाकुडापासून कापूर बनवला जातो. या झाडाच्या लाकडाचा अर्क आणि तेलदेखील बनवले जाते सौंदर्यप्रसाधना आणि औषधांमध्ये याचा वापर केला जातो. 

आयुर्वैद, एलोपॅथी आणि होमियोपॅथी औषधी वापरण्यासाठीही कापराचा वापर होते. कापराचे गुणधर्म थंड असतो. कापूर आणि गायीच्या तूपाचा वापर करुन काजळ बनवले जाते. त्यामुळं डोळे थंड राहतात. कापराचे झाड तुम्हा घरात, अंगणात किंवा बागेत इतकंच नव्हे तर कुंडीतही लावू शकता. कापराचे झाडाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. 

कापराच्या झाडाचे आरोग्यासाठी फायदे

कापराच्या झाडाच्या संपर्कात राहणारे लोक नेहमी निरोगी असतात

हे झाड पर्यावरणातील हवा शुद्ध करण्यास मोठी मदत करते

कापराचे झाड आपल्याला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करते. 

वास्तू आणि ज्योतिषीय फायदे

कापराचे झाड लावल्याने घरातून आजारपण दूर राहते

घराजवळ असलेली नकारात्मक उर्जा नाहिशी होते

या झाडामुळं घराजवळ व घरात सुंगध दरवळतो आणि वातावरण प्रसन्न राहते 

कापूराचे झाड धन आणि संपत्तीला आकर्षित करते

या झाडांमुळं नात्यांमधील कटुता दूर होते 

कापराचे झाड घरात ठेवल्याने सुख, शांती निर्माण होते. 

Related posts