National Flag Code Of India Tiranga 15 August Independance Day Flag Made In Khadi Institution

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: जेव्हा कुठेही तिरंगा (Tiranga Flag) फडकत असतो ते दृश्य आपल्याला सुखावणारे असते. पण हाच तिरंगा लाल किल्ल्यावर फडकताना पाहून तर आपल्यामध्ये एक प्रकारची अभिमानाची भावना निर्माण होते. पण लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो हे माहिती आहे का? त्याची निर्मिती कशी केली जाते हे माहिती आहे का?  

आपल्या देशात अधिकृत प्रदर्शनासाठी सर्व प्रसंगी तिरंगा ध्वज हा केवळ भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards- BIS) द्वारे निश्चित केलेल्या वैशिष्ट्यांशी सुसंगत असेल आणि त्यांच्या मानक चिन्हासह (Flag Code of India) ध्वज वापरला जाईल असं फ्लॅग कोडमध्ये सांगण्यात आलं आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने 30 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या आदेशान्वये भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रध्वज हा हाताने विणलेला किंवा मशिनच्या माध्यमातून तयार केलेला असेल असं सांगण्यात आलं आहे. 

Tiranga On Red Fort : लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो? 

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो. पण हा तिरंगा तयार करण्यासाठी काही मानके आहेत. हा तिरंगा हा ऑर्डनन्‍स टेक्‍स्‍टाईल फॅक्‍टरी, शाहजहांपूर या ठिकाणी तयार केला जातो. तसेच लाल किल्ल्यावर फडकवण्यात येणारा तिरंगा हा रेशमापासून बनलेला असतो. 

देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणी फडकवण्यात येणारा ध्वज तयार करण्यासाठी एकूण चार खादी संस्था काम करतात.  भारतीय मानक-I (IS-I) राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीसाठी त्यांना BIS परवाना आहे. IS-I राष्ट्रीय ध्वज बनवणाऱ्या खादी संस्थांची नावे पुढीलप्रमाणे, 

1. कर्नाटक खादी ग्रामोद्योग युनायटेड फेडरेशन, हुबळी, कर्नाटक.
2. सेंट्रल इंडिया खादी युनियन, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
3. खादी डायर्स आणि प्रिंटर्स, बोरिवली, महाराष्ट्र.
4. धारवाड तालुका गर्ग प्रादेशिक सेवा संघ, कर्नाटक.

महात्मा गांधींनी तिरंगा ध्वजाची संकल्पना मांडली

महात्मा गांधींनी 31 मे 1921 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत तिरंगा ध्वजाची संकल्पना मांडली. तीन रंगात असलेल्या या ध्वजामध्ये वरती लाल, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरव्या रंगाचा समावेश होता. मध्यभागी पांढऱ्या रंगात चरख्याची प्रतिमा होती. गांधीवादी नेते पिंगली व्यंकय्या यांनी या ध्वजाची रचना तयार केली. नंतरच्या काळात या ध्वजाच्या रंगात बदल करण्यात आला. 

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 22 जुलै 1947 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. या बैठकीत स्वतंत्र भारताचा ध्वज प्रस्तावित करण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा होऊन भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आणि मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र अशा तिरंग्याचा स्वीकार करण्यात आला. 

ही बातमी वाचा:

[ad_2]

Related posts