Fenugreek Seeds Benefits; भिजलेल्या मेथी दाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे, आजारांना करेल छुमंतर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेथी दाण्याच्या पाण्यातील पोषक तत्व

मेथी दाण्याच्या पाण्यातील पोषक तत्व

​मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी च्या पोषक तत्वाने मेथी दाण्याचे पाणी भरलेले आहे.

मेथी दाण्याचे पाणी पिण्याने पचनशक्ती सुधारण्यासह शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि हाडंही मजबूत होतात. तसंच पोटातील चरबी कमी होऊन त्वरीत वजन कमी होते.

मेथीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवत अनेक आजारांना दूर करतात.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी

तुम्हाला बऱ्याच काळापासून वजन कमी करायचे असेल तर मेथीचे पाणी यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यात अधिक प्रमाणात फायबर असते, जे पोट भरलेले ठेवते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि उगीचच पदार्थ खाल्ले जात नाहीत. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसंच मेथी दाण्यातील आढळणारे गुण पोटावरील चरबी जाळण्यास मदत करतात.

(वाचा – पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी काय खावे, श्री श्री रवि शंकर यांनी शेअर केले वेट लॉस सिक्रेट)

पचनशक्तीसाठी फायदेशीर

पचनशक्तीसाठी फायदेशीर

भिजवलेल्या मेथी दाण्याचे पाणी पिण्यामुळे पचनाशी निगडीत समस्या दूर होतात. हे पाणी पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमधील फायबर हे मलत्याग करण्यास उपयुक्त ठरते. शौचाला कडक होत असण्याची समस्या असेल तर यामुळे त्यातून सुटका मिळते. तसंच मेथीच्या पाण्यात पाचक एंजाईम असून जेवण सोप्या पद्धतीने पचवते.

(वाचा – बद्धकोष्ठतेची समस्या होईल १ दिवसात गायब, ३ चमत्कारी उपाय आणि पोटातील घाण होईल छुमंतर)

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी

भिजवलेल्या मेथी पाण्याच्या सेवनाने मधुमेह अर्थात डायबिटीस नियंत्रणात येण्यास मदत मिळते. मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. हे पाणी नियमित पिण्याने डायबिटीस नियंत्रणात राहतो आणि शरीरही हेल्दी राहाते. हे पाणी डायबिटीसमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवून देते.

(वाचा – ६० व्या वर्षीही दिसाल तरूण आणि आकर्षक, आरोग्यासाठी करा फक्त ही २ कामं)

हृदयासाठी फायदेशीर

हृदयासाठी फायदेशीर

हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठीही भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. मेथीचे पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्टसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसंच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी होईल फायदा

त्वचेसाठी होईल फायदा

भिजवलेल्या मेथी पाण्यामुळे त्वचेला फायदा मिळतो. हे पाणी त्वचेची अलर्जी कमी करण्यास मदत करते. तसंच मेथीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग निघून जाण्यास मदत मिळते. हे पाणी त्वचा मुलायम करण्यासह चमकदार होण्यासही मदत मिळते.

कसे तयार कराल मेथीचे पाणी

कसे तयार कराल मेथीचे पाणी

भिजवलेल्या मेथीचे पाणी बनविण्यासाठी १ चमचा मेथी दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा आणि सकाळी उठून उपाशीपोटी ते प्या. तुम्हाला जर याची अलर्जी असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच प्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts