[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नियम 1: योग्य वेळी अन्न खाण्याची सवय लावा
डॉ रॉबिन सांगतात की, जोपर्यंत तुम्ही पहिले खाल्लेले जेवण पूर्णपणे पचत नाही तोपर्यंत दुसरे जेवण खाऊ नका. दिवसभरातील सर्वात पौष्टिक जेवण सकाळीच असावे तर दुपारचे जेवण सकाळच्या जेवणाच्या अर्धे असावे आणि रात्रीचे जेवण हे अंधार होण्याआधीच अर्थात संध्याकाळी 7 वाजता किंवा त्याआधीच करावे आणि ते दुपारच्या जेवणापेक्षाही कमी असावे.
(वाचा :- ना डाएटिंग-ना एक्सरसाईज, पाण्यात मिसळून प्या हे घरगुती चूर्ण, लोण्यासारखी झर्रकन वितळेल पोट व मांड्यांची चरबी)
नियम 2: तुम्हाला भूक लागेल त्यापेक्षा कमी खा
चांगल्या पचनासाठी, व्यक्तीने नेहमी जेवढी भूक आहे त्यापेक्षा एक तृतीयांश कमी अन्न खावे. आपले अन्न नेहमी 3 भागांमध्ये विभागून खा, ज्यामध्ये पहिला भाग – घन अन्न, दुसरा – द्रव अन्न आणि तिसरा भाग नेहमी रिकामा ठेवा. यामुळे तुमचा चयापचय दर वाढेल आणि शरीरातील चरबी कमी होईल. कमी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जीने परिपूर्ण असाल, सतर्क राहाल आणि तुमची विचारशक्तीही तीक्ष्ण होईल.
(वाचा :- Insulin Resistance : शरीराच्या कोणत्याही भागात हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरकडे जा, समजून जा खूप वाढलं इन्सुलिन)
नियम 3 : ही गोष्ट मिक्स करून प्या
साधारण अर्धा चमचा आल्याचा रस, 1 चमचा बडीशेप आणि थोडेसे काळे मीठ घेऊन ते एक ग्लास पाण्यात मिसळा. जेवणानंतर दिवसातून दोनदा ह ड्रिंक नियमितपणे घेणे सुरू करा. यामुळे तुमचे पचन नीट होण्यास सुरुवात होईल आणि इतकंच नाही तर यातून खाण्या-पिण्याचं प्रमाणही शरीरावर दिसेल. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याशी संबंधित हे नियम अंगीकारले तर तुम्हाला तुमच्या शरीरावर त्याचा फरक दिसू लागेल.
(वाचा :- AI Robot पेक्षा गतीमान बनेल मेंदू, करा ही 6 कामं, स्मरणशक्ती व बुद्धी होईल घोड्याहून तेज, मिळेल सर्व कामांत यश)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]