Pradosh Vrat 2023 : आज श्रावण ‘अधिक’ प्रदोष व्रत! 3 शुभ योगांमध्ये राशीनुसार करा भगवान भोलेनाथाची पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravi Pradosh Vrat 2023 : आज श्रावण अधिक मासातील पहिलं प्रदोष व्रत आहे. आजचं प्रदोष व्रत हे अतिशय खास आहे. जे प्रदोष व्रत रविवारी येतं त्याला रवी प्रदोष व्रत असं म्हणतात. आज प्रदोष व्रताच्या दिवशी अनेक योग जुळून आले आहेत. गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि इंद्र योग तयार झाले आहेत. या 4 शुभ योगांमुळे आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योगात केलेली कामं ही कायम यशस्वी होतात. प्रदोष व्रत हे भगवान शंकराची उपासना करायची असते. भोलेनाथाचा आशिर्वाद मिळविण्यासाठी आज राशीनुसार पूजा केल्यास तुम्हाला नक्कीच फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.(Sawan Adhik Pradosh Vrat 2023 3 yoga made on ravi pradosh vrat 2023 shiv puja as per zodiac signs)

 

3 शुभ योगातील प्रदोष व्रत 2023

सर्वार्थ सिद्धी योग : पहाटे 05:41 ते रात्री 09:32 वाजेपर्यंत 
इंद्र योग : सकाळी 06:34 वाजेपर्यंत 
रवि योग : रात्री 09:32 पासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 जुलैला पहाटे 05.42 वाजेपर्यंत
श्रावण अधिक मास शुक्ल त्रयोदशी तिथी :  सकाळी 10.34 ते 31 जुलै सोमवार सकाळी 07.26 वाजेपर्यंत
प्रदोष व्रत पूजा मुहूर्त : संध्याकाळी 07.14 ते रात्री 09.19 वाजेपर्यंत

सावन प्रदोष 2023 शिवपूजा

 मेष (Aries) : ओम नमः शिवाय या जपासह शंकराला लाल फुलं, लाल चंदन आणि बेलपत्र अर्पण करा.

वृषभ (Taurus)  : ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना भगवान भोलेनाथांना गंगेचं पाणी, गाईचं दूध, पांढरी फुलं, दही इत्यादी अर्पण करा.

मिथुन (Gemini) : ओम नमः शिवाय कलाम महाकाल कलाम कृपालम ओम नम: मंत्राचा उच्चार करताना शंकराला उसाचा रस, डूब, भांग, धतुरा, मूग, दही इत्यादी अर्पण करा.

कर्क (Cancer)  : ओम चंद्रमौलेश्वर नम: जपासह भगवान चंद्रशेखर यांची गाईचं दूध, पांढरी फुलं, चंदन, बेलपत्र, भांग इत्यादींनी पूजा करा.

सिंह (Leo) : ओम नमः शिवाय कलाम महाकाल कलाम कृपालम ओम नम: मंत्राचा उच्चार करताना भगवान शंकरांना लाल फूल, आक फूल, गहू, गूळ मिश्रित पाणी अर्पण करा.

कन्या (Virgo)  : ओम नमः शिवाय कलाम महाकाल कलाम कृपालम ओम नमः मंत्र तुमचं कल्याण करेल. तुम्ही शिवाला गंगाजल, वेलीची पानं, भांग, धतुरा, उसाचा रस इत्यादी अर्पण करा.

तूळ (Libra) : मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणताना भगवान शंकराला दही, मध, पांढरं चंदन, श्रीखंड, गंगाजल इत्यादी अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio)  : भगवान महादेवाला पंचामृत, लाल फुलं, बेलपत्र, लाल गुलाब इत्यादी अर्पण करावं आणि ओम ओम जं मंत्राचा जप करावा.

धनु (Sagittarius) : ओम नमो शिवाय गुरु देवाय नम: या मंत्राचा उच्चार केल्यानंतर भगवान भोलेनाथांना पिवळी फुले, पिवळे चंदन, बेलपत्र, साखर मिठाई, गाईच्या दुधात साखर मिसळून अर्पण करा.

मकर (Capricorn) आणि कुंभ (Aquarius) : ओम हौम ओम जुन स: मंत्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे. शिवलिंगावर निळी फुले, शमीची पाने, बेलपत्र, भांग, उडदाची मिठाई इत्यादी अर्पण करा.

मीन (Pisces) : ओम नमो शिवाय गुरु देवाय नमः मंत्र तुमच्यासाठी चांगला आहे. शिवपूजेसाठी तुम्ही दूध, केशर, पिवळी फुले, नागकेसर, दही आणि तांदूळ वापरता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts