Shukra Vakri 2023 Venus retrograde in Sun sign big upheaval in this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shukra Vakri 2023 Effects : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख आणि समृद्धीचा कारक मानण्यात आलं आहे. नुकतंच म्हणजेच 23 जुलै रोजी, शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीमध्ये वक्री ( Shukra Vakri ) झाला आहे. शुक्राची ही स्थिती 4 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ( Shukra Vakri ) चांगला आणि शुभ स्थितीत असेल तर त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. 

मात्र दुसरीकडे शुक्र ग्रहाची अशुभ स्थिती व्यक्तींच्या आयुष्य उद्धवस्त करू शकते. दरम्यान शुक्राच्या वक्री ( Shukra Vakri ) गतीचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. मात्र यावेळी शुक्राची वक्री ( Shukra Vakri ) गती कोणत्या राशींसाठी धोकादायक ठरणार आहे ते पाहुयात.

मेष रास

सिंह राशीतील शुक्राची वक्री ( Shukra Vakri ) गती मेष राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकते. या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं. कर्ज घ्यावे लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार असू शकतात. व्यापाऱ्यांना नफा कमी होण्याची अपेक्षा आहे. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

कर्क रास

शुक्राच्या वक्री ( Shukra Vakri ) गतीमुळे कर्क राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अचानक आलेल्या त्रासामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.  या काळात तुम्हाला मानसिक तणाव अशुभ असू शकतो. नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. ऑफिसमध्ये केलेल्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने मन चिंतेत राहील. 

कन्या रास

शुक्राच्या वक्री ( Shukra Vakri ) गतीचा तुमच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडू शकतो. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी. वादांपासून दूर राहा. कोणत्याही गुंतवणुकीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts