Sadhguru Jaggi Vasudev shared that his breakfast comprises of sprouted methi seeds or fenugreek seeds with sprouted moong or green gram for healthful living; सद्गुरूंनी हेल्दी लाइफचे सिक्रेट केले शेअर, दररोज सकाळी एक चमचा खायला सांगितला ‘हा’ मोड आलेला पदार्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​मोड आलेली मेथी नॅच्युरल ब्लड क्लींजर

​मोड आलेली मेथी नॅच्युरल ब्लड क्लींजर

अंकुरलेली मेखी हे नैसर्गिक रक्त शुद्ध करण्याचे उत्तम स्त्रोत आहे. जे रक्त शुद्ध करते आणि त्यात ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते.तसेच सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

​केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

​केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

मेथीचे दाणे केसांमध्ये लावल्याने केस गळणे थांबते. त्याचबरोबर हे रोज खाल्ल्याने त्वचा आणि केस दोघांचेही आरोग्य चांगले राहते.

​​​(वाचा – श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलं Intermittent Fasting म्हणजे काय? फॉलो करण्याची योग्य पद्धत)

पोषणयुक्त अंकुरलेले मेथीचे दाणे

पोषणयुक्त अंकुरलेले मेथीचे दाणे

मधुमेहाच्या रुग्णांना रोज सकाळी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ते सर्वांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

​(वाचा – २१० किलो वजन उचलताना बॉडीबिल्डर जस्टीन विकीचा जागीच मृत्यू, व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर, काय चुका टाळाल?)​

ब्लड शुगर- कोलेस्ट्रॉल करता फायदेशीर

ब्लड शुगर- कोलेस्ट्रॉल करता फायदेशीर

डायबिटिस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मोड आलेली मेथी न चुकता खावी. यामुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. यासोबतच कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मेथी मदत करते. शरीरातील घाणेरडा कोलेस्ट्रॉल यामुळे होतो कमी.

​(वाचा – आयुर्वेदानुसार पावसात दूध कसे प्यावे? ज्यामुळे कफ, खोकला होणार नाही उलट औषध म्हणून करेल काम)​

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी महत्वाचे

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी महत्वाचे

ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मातांनी आवर्जून मोड आलेली मेथी खावी कारण याचे असंख्य फायदे आहेत. यामुळे बाळालाही कोणताही त्रा​स होत नाही आणि माता, बाळ या दोघांचेही पचन उत्तम राहते.

​​(वाचा – कोणत्या वयात किती पावलं चालणे महत्वाचे, लठ्ठपणा दूर करण्यासाठी फॉलो करा हा चार्ट)

​पचनासाठी उत्तम

​पचनासाठी उत्तम

रोज सकाळी रिकाम्या पोटी अंकुरलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगवणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

(वाचा – चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या Monsoon Food Guide करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल)​

​कशी खावी मोड आलेली मेथी

​कशी खावी मोड आलेली मेथी

सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मेथीचे दाणे मोड आलेले असतील तर ते अधिक फायदेशीर ठरतात. एक ते दोन चमचे मेथीचे दाणे भिजवून त्याला मोड काढा. यापेक्षा अधिक सेवन करू नये कारण पचनशक्तीवर परिणाम होऊन शरीरात गरम पडू शकतात.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts