Swami Ramdev Baba Explained Yoga Asanas To Reduce Belly Fat Within 10 Days; १० दिवसात जाळेल पोटाची चरबी, बाबा रामदेव यांनी सांगितला योगातील अचूक रामबाण उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अर्धहलासन

अर्धहलासन
  • अर्धहलासन करण्यासाठी सर्वात पहिले योगा मॅटवर पाठीवर झोपादोन्ही हात सरळ मांडीपर्यंत ठेवा
  • त्यानंतर दोन्ही पाय एकामागोमाग एक ३० ते ६० डिग्रीमध्ये हलवा
  • यादरम्यान मान आणि कंबर ही जमिनीवरच ठेवावी
  • साधारण ३-५ सेट्स केल्यानंतर हे आसन करणे थांबवा

अर्धहलासन नियमित केल्यामुळे लठ्ठपणाच्या समस्येपासून सुटका मिळते. पोट आणि पाठिशीसंबंधित सर्व समस्या दूर करण्यास मदत मिळते. पोट कमी करण्यासाठी या योगाचा अधिक उपयोग केला जातो. पचनतंत्र सुधारून पोटाच्या समस्या दूर होतात आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

पादवृत्तासन

पादवृत्तासन
  • पादवृत्तासन करण्यासाठी योगा मॅटवर तुम्ही पाठीवर झोपा
  • दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा
  • त्यानंतर उजवा पाय वर उचलून गोल गोल फिरवा आणि त्यानंतर डाव्या पायानेही तसंच करा
  • साधारण ३-५ सेट्स तुम्ही हे आसन करू शकता. हे पाय १५-२० वेळा गोल फिरवणे गरजेचे आहे. तसंच जोरजोरात न फिरवता मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे हे आसन करा

पादवृत्तासनाचे वजन कमी करण्यासाठी अनेक फायदे होतात. तसंच पोटाची चरबी त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. पादवृत्तासनामुळे शरीराचे संतुलन राखण्यास फायदा होतो आणि याशिवाय तुम्हाला कंबरदुखी असेल तर ती बरी होण्यासही फायदा मिळतो.

(वाचा – सकाळी २० मिनिट्स अनवाणी गवतावर चालण्याचे जबरदस्त फायदे, तज्ज्ञांचे अफलातून गणित)

द्विचक्रिकासन

द्विचक्रिकासन
  • द्विचक्रिकासन करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा
  • त्यानंतर दोन्ही पाय पोटापर्यंत त्रिकोणाकृती जवळ घ्या आणि फुलपाखराप्रमाणे दिसू लागल्यावर त्याच पोझिशनमध्ये वर घेऊन पुन्हा खाली घ्या
  • यामुळे पोटावर प्रेशर येऊन पोटावरील चरबी त्वरीत विरघळ्यास मदत मिळते

तुम्हाला त्वरीत वजन कमी करायचे असेल तर या योगासनाचा आपल्या रोजच्या सरावत तुम्ही समावेश करून घ्यायला हवा. कोणतेही प्रयत्न करून वजन कमी होत नसेल तर द्विचक्रिकासन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. यामुळे अनेक आजार दूर राहतात.

(वाचा – नसांमध्ये जमलेली घाण बाहेर काढेल ही आयुर्वेदिक वनस्पती, कोलेस्ट्रॉल खेचून काढत आजारांवर ठरेल उपयोगी)

भुजंगासन

भुजंगासन
  • पोटाच्या बाजूला झोपा आणि त्यानंतर पाय सरळ रेषेत ठेवा
  • मान आणि पोटाचा भाग वर उचलून हातावर भार द्या
  • असे तुम्ही साधारण १०-१५ वेळा करा जेणे करून पोटावर जोर येईल

भुजंगासनामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते. सकाळी उपाशीपोटीच हा योगा करावा. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. पोट आणि पाठीसाठी उपयोग आहे. भुजंगासन करण्याआधी सुरूवातील योग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच करावे. पोट त्वरीत कमी करण्यासाठी या योगाचा आधार घ्यावा.

(वाचा – Bowel Movement शौचाला कडक होत असेल तर दुरूस्त करण्यासाठी करा ४ योगासने, पचनसंबंधित समस्या होतील छूमंतर)

उत्तानपादासन

उत्तानपादासन
  • सर्वात पहिले पाय सरळ ठेऊन पोटावर झोपा
  • त्यानंतर दीर्घ श्वास घ्या वर या आणि पुन्हा श्वास सोडून खाली जा
  • असे तुम्ही १५-२० केल्यास, पोटावर प्रेशर येऊन पोट कमी होण्यास मदत मिळते.

उत्तानपादासनामुळे पोटाची चरबी कमी होऊन पोटासंबंधित आजारापासूनही सुटका मिळते. तुम्हाल पचनसंबंधित समस्या असतील तर हे आसन तुम्ही नियमित करावे. तसंच नाभी संतुलित करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि तुम्हाला अ‍ॅब्स बनविण्यासाठीही या आसनाचा उपयोग करून घेता येईल.

[ad_2]

Related posts