Shubman Gill Sister Shahneel abused Online by trollers after RCB kicked out of IPL 2023 playoff; भावावर राग, बहिणीला शिवीगाळ; बंगळुरुला धुणाऱ्या शुभमनच्या ताईला ट्रोलर्सनी नको ते सुनावलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुभमन गिलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध नाबाद शतक झळकावून त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर ढकलले. यानंतरच शुभमनची बहीण शहनील गिलला ऑनलाइन ट्रोल करण्यात आले.रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांना आयपीएल २०२३ मधून बाहेरचा रस्ता धरावा लागला. चिन्नास्वामी स्टेडियम या घरच्या मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीच्या पदरी निराशाच पडली. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या बंगळुरुने विराट कोहलीच्या (६१ चेंडूत नाबाद १०१ धावा) सनसनाटी शतकाच्या बळावर २० षटकांत ५ बाद १९७ अशी मोठी धावसंख्या उभारली.

शाहरुख खानचा खरा हिरो ठरलेल्या रिंकू सिंगचे पाय जमिनीवर! टीम इंडियातील निवडीवर मन जिंकणार वक्तव्य
प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. शुभमन गिलने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत सिझनमधील आपले सलग दुसरे शतक झळकावले. शुभमनने ५२ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. त्यात पाच चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे.

शुभमनच्या बहिणीची कमेंट

या अतुलनीय खेळीनंतर शुभमन गिलने त्याच्या खेळीचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, “आता सुरुवात झाली आहे” यावर शुभमनची बहीण शहनीलने “माय बेबी” अशी कमेंट केली.

बिखरने का मुझको शौक़ है बड़ा! पराभवानंतर कोहलीने तोंड लपवलं, सिराज हवालदिल, अनुष्का तर…
शहनीलच्या कमेंटवर अनेक ट्रोलर्सनी तिला अपशब्द वापरून उत्तर दिले. आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या शुभमन गिलला फटकारले. तिच्या याआधीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही तिला लक्ष्य करण्यात आले होते.


आयपीएल २०२३ मधील शेवटच्या लीग मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत चाहत्यांचाही ‘विराट’ स्वप्नभंग झाला. कारण गुजरात टायटन्सविरोधात प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं होतं. १३ सामन्यांनंतर आरसीबीचे १४ गुण झाले होते. कालच्या विजयाने प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले असते, कारण त्यांची धावगती मुंबई इंडियन्सपेक्षा चांगली होती.

RCB Playoffs: IPLची ट्रॉफी हातात येता-येता निसटून जाते, RCBचं नेमकं कुठं चुकतंय?



[ad_2]

Related posts