Siddharth Chandekar Weight Loss Transformation Journey He Lost 16 kg in 6 Months; सिद्धार्थ चांदेकरने ६ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, १०३ किलोवरून ८७ किलोपर्यंत आणलं वजन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​निरोगी शरीराकरिता

​निरोगी शरीराकरिता

निरोगी राहण्यासाठी योग्य डाएट आणि वर्कआऊटची गरज असते. सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टमध्ये जानेवारीपासून आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवास जानेवारी महिन्यात सुरू झाला. मला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण गेले. पण आता मी हा प्रवास एन्जॉय करत असल्याचं सिद्धार्थ म्हणाला.

​शरीराविषयी आदर महत्वाचा

​शरीराविषयी आदर महत्वाचा

सिद्धार्थ सांगतो की, जानेवारी महिन्यापर्यंत त्याला शरीराबद्दल अजिबातच आदर नव्हता. पण त्याच्या या नकारात्मक विचारातून त्याच्या फिटनेस ट्रेनरने बाहेर काढलं. १०३ किलोच्या सिद्धार्थने आतापर्यंत १६ किलो वजन कमी केलंय. त्याचा हा प्रवास अजूनही सुरू आहे. शरीराचा आदर करण्यासाठी शरीराला जे चांगल आहे तेच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही देखील सिद्धार्थकडून हा आदर्श घेऊ शकता.

​चांगल जीवन जगण्यासाठी

​चांगल जीवन जगण्यासाठी

प्रत्येकाला चांगल जीवन जगायचं असतं. सिद्धार्थ सांगतो की, चांगल जीवन जगण्यासाठी चांगल माणूस व्हायला हवं आणि यासाठी शिस्त अतिशय महत्वाची आहे. प्रामाणिकपणे कोणतेही काम केल्यावर त्याचा रिझल्ट चांगला असतो. त्यामुळे या जीवनशैलीचा सिद्धार्थने स्वीकार केलेला आहे.

​​(वाचा – जास्त घाम येणे हे Diaphoresis या जीवघेण्या आजाराचे लक्षण तर नाही? या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)

​Burpees चे आरोग्यदायी फायदे

​Burpees चे आरोग्यदायी फायदे

Healthline ने दिलेल्या रिपोर्टनुसार, वजन कमी करताना Burpees हा व्यायाम प्रकार खूप मदत करतो. सिद्धार्थ चांदेकर देखील बर्पिस करताना दिसत आहे. हा व्यायाम प्रकारातील अतिशय प्रभावी प्रकार आहे. आपण याचे ८ फायदे जाणून घेऊया.

  • हृदयाची गती वाढते
  • एकाच वेळी खूप कॅलरीज बर्न करतात
  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते
  • सहनशक्ती सुधारते
  • हाडांची घनता वाढते
  • हा व्यायम प्रकारासाठी उपकरणांची आवश्यकता नाही
  • तुमचे संपूर्ण शरीर मजबूत होते
  • कुठेही करता येतात.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts