Poco-m6-pro-5g-smartphone-launched-in-india-check-price-offers-specifications Marathi News | Poco M6 Pro 5G Launched : Poco चा M6 Pro 5G बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत 10,000 पेक्षाही कमी



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poco M6 Pro 5G Launched : तुम्हाला जर बजेट फ्रेंडली स्मार्टफोन हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Xiaomi च्या सब-ब्रँड Poco ने भारतात बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आज दुपारी 12 या स्मार्टफोनचं लॉंचिंग होणार आहे. स्मार्टफोनचा लाँचिंग इव्हेंट तुम्ही घरबसल्या कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. Poco M6 Pro 5G ला 5000 mAh बॅटरी, 6GB RAM आणि 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काय वैशिष्ट्य असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Poco M6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Poco M6 Pro 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंचाचा FHD + LCD डिस्प्ले आहे जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर, 18W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आणि साउंड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि दुसरा 2MP कॅमेरा आहे, फ्रंट सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco M6 Pro 5G ची किंमत किती?

Poco M6 Pro 5G ची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. कंपनीने स्वतः एक पोस्ट शेअर करून मोबाईल फोनच्या किंमतीचा खुलासा केला आहे. पोकोने एका पोस्टमध्ये फोनच्या किंमतीचे शेवटचे 3 अंक शेअर केले आहेत. जे X999 आहे. 

नुकताच Infinix ने हा फोन लॉन्च केला आहे 

Infinix ने अलीकडेच Infinix GT 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डाने तुम्ही मोबाईल फोनवर 2,000 रुपये वाचवू शकता. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 8050 प्रोसेसरचा सपोर्ट आहे.  

महत्त्वाच्या बातम्या :

Artificial intelligence : AI मुळे पुरुषांपेक्षा महिलांची नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका? अभ्यासातून स्पष्ट

Related posts