Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला ‘या’ 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Friendship Day 2023 : आज रविवारी 06 ऑगस्ट 2023 म्हणजे मैत्रीच्या नात्याचा दिवस. रक्तापेक्षा जास्त जवळं आणि आपलं हक्काचं वाटणारं नातं म्हणजे मैत्री. या व्यक्तीसमोर आपण जे असतो तसे असतो. आपल्या चुकांवर रागवणारा आणि संकटात आपल्यासोबत उभा असणारा निस्वार्थ प्रेम करणारा तो एकच असतो आपला सख्खा मित्र. आपण कुटुंबातील सदस्यांशिवाय सगळ्यात जास्त वेळ असतो तो म्हणजे या मित्र परिवारासोबत. जगभरात आज मैत्री दिवस साजरा करण्यात येणार आहे. मित्राला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. अशा या दिवशी आपण त्याला काही तरी गिफ्ट पण देतो. जर तुम्ही अजून गिफ्ट घेतलं नसेल तर वास्तूशास्त्रानुसार कुठल्या वस्तू गिफ्ट म्हणून द्यायच्या नसतात, ते जाणून घ्या.  (Friendship Day 2023 never gift these things to friends vastu tips in marathi)

आपली मित्राची आवड समजून फ्रेंडशिप डेला गिफ्ट हुशारीने निवडा. कारण काही भेटवस्तू अशा असतात ज्या तुमच्या मित्रांना कधीही देऊन नयेत. नाही तर तुमची मैत्री तुटू शकते. शिवाय त्या वस्तू कधीही दानही करु नयेत. 

फाउंटन शोपीस 

फाउंटन शोपीस, पाण्याचे कारंजे, फिश बाऊल, मत्स्यालय इत्यादी पाण्याच्या घटकांशी संबंधित वस्तू कधीही गिफ्ट करु नयेत. या वस्तू गिफ्ट केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

परफ्यूम किंवा अत्तर 

मित्रांना परफ्यूम, अत्तर किंवा सुगंधी वस्तू गिफ्ट देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी गिफ्ट केल्याने नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते आणि मित्रांसोबतचे तुमचं नातं खराब होऊ शकतं.  म्हणूनच फ्रेंडशिप डेला परफ्यूम गिफ्ट कधीही करु नका. 

काळ्या रंगाच्या वस्तू

काळ्या वस्तू भेट म्हणून देणे अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार काळे कपडे किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नका. कारण यामुळे दोघांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो, शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

रुमाल

वास्तुशास्त्रात रुमाल भेट म्हणून देणे अत्यंत अशुभ मानलं जातं. मित्रांना रुमाल भेट दिल्यानेही मैत्री तुटण्याची भीती असते. म्हणूनच फ्रेंडशिप डेच्या दिवशी चुकूनही मित्रांना रुमाल गिफ्ट म्हणून देऊ नका. 

 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts