Independence Day 2023 Speech : स्वातंत्र्यदिनाला भाषण द्यायचंय? हा संदर्भ वाचून पाहा पटकन लक्षातही राहील

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Independence Day 2023 Long and Short Speech : 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा दिवस. 1947 मध्ये याच दिवशी ब्रिटीश राजवटीनं भारतातून काढता पाय घेतला आणि शेकडो क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान सार्थकी लागलं. कारण, देश स्वातंत्र्य झाला. असा हा दिवस दरवर्षी शासनासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. 

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तर, शाळा आणि महाविद्यालयांह तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये वक्तृत्त्वं स्पर्धांचंही आयोजन करण्यात येतं. या दिवशी सकाळी उठून गणवेश परिधान करून झेंडावंदनासाठी पोहोचण्यासाठी प्रत्येकाचीच लगबग असते. तुमच्याही घरी हेच चित्र असतं ना? काय सांगता, यंदा तुमच्या मुलांना या दिवशी भाषण करायचंय? 

दोन क्षण शांत बसा, अजिबातच चिंता करू नका. कारण, इथं आपण स्वातंत्र्यदिनानिमित्तानं एक छानसं आणि प्रभावी भाषण पाहणार आहोत. हे इतकं सोपंय की, लगेचच तुमच्या मुलांच्या लक्षातही राहील. त्यामुळं पाठांतरासाठी त्याच्या किंवा तिच्यामागेही लागायला नको. 

 

भाषणासाठीचे काही पर्याय आणि विषय… 

– उज्ज्वल भवितव्याची उभारणी करणारा भारत 
– स्वातंत्र्याचे खरे नायक आठवताना…. 
– विविधतेत एकता: भारताची खरी ओळख 
– स्वातंत्र्य तेव्हापासून आतापर्यंत…

स्वातंत्र्यदिनासाठी लहानसं तरीही तितकंच प्रभावी भाषण द्यायचंय? हे वाचून पाहा… 

‘मान्यवरांचं स्वागत आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक देशभक्ताला अभिवादन करून मी भाषण सुरु करतो/ करते. 

देश स्वातंत्र्य होऊन उजाडलेला आणखी एक दिवस. आणखी एक संधी आणि देशाला पुढे नेण्यासाठी होणारा आणखी एक लाखामोलाचा प्रयत्न. एक एक प्रयत्न म्हणता म्हणता आज नकळत आपण कोट्यवधी भारतीय देशाला उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं पुढे नेत आहोत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेकांची मुल्य या आज आपल्या आदर्शस्थानी आहेत. पण काही बाबतीत मात्र आजही आपण किती मागे आहोत याची जाणिव होते आणि मन सुन्न होतं. 

आपण स्वतंत्र झालो खरे, पण या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली हे अजिबातच विसरून चालणार नाही. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक नागरिक म्हणून तुम्हाआम्हा सर्वांचीच ही जबाबदारी आहे की आपण या लोकशाही राष्ट्राची ओळख होऊन त्याला साजेशी कामगिरी करु. चांगले विचार पुढे नेऊन, समाज सुधारण्यासाठी आपलं योगदान देऊ. देशातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून आपणही थोडेथोडके प्रयत्न करु. कारण, हा देश तेव्हात पुढे जाईल जेव्हा देशाता आत्मा, देशातील तळागाळाचे घटक समाधानी असतील आणि तेसुद्धा प्रगतीच्या वाटेवर चालतील. कारण, भारत म्हणजे जबबादारी, भारत म्हणजे कर्तव्य आणि भारत म्हणजे आपली ओळख आहे. 

पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा; धन्यवाद, 
जय हिंद, जय भारत!’

हे झालं एक लहानसं भाषण. याहून मोठं भाषण करायचं झाल्यास देशात सुरु असणाऱ्या ताज्या घडामोडी आणि राजकाराणाचा संदर्भ घेत मागील वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांचा तुम्ही आढावा घेऊ शकता. इतकंच नव्हे, तर वक्ता म्हणून तुम्ही समोर असणाऱ्या श्रोत्यांना भाषणातून काही प्रश्न विचारत भाषणाला संवादाचंही रुप देऊ शकता. ज्यामुळं तुमचं भाषण अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरू शकतं. 

Related posts