( प्रगत भारत । pragatbharat.com)
Man Ditches Honeymoon: लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीत क्षण असतो. हीच तीच वेळ असते जेव्हा पती-पत्नी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात. पण काहीवेळा या आनंदाच्या प्रसंगावर विरजन पडतं. हनीमुनला (Honeymoon) गेलेल्या एका जोडप्याबरोबरच अशीच एक विचित्र घटना घडली. एक तरुण आपल्या नववधूबरोबर हनीमूला गेला. सुरुवातीचे एकदोन दिवस त्यांचे आनंदात गेले. यदरम्यान पत्नीने आपल्या लग्नाचा अल्बम (Wedding Album) पतीला दाखवला. पण तो अल्बम पाहून आनंदी होण्याऐवजी पती रागाने लालबूंद झाला. त्याने पत्नीबरोबर वाद घातला आणि तिला एकटीलाच सोडून तो तडक घरी परतला.
वास्तिवक या तरुणाचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा होता आणि मुलावर त्याचा प्रचंड जीव होता. पहिल्या पत्नीचं निधन झाल्याने त्याने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट त्याने होणाऱ्या पत्नीला सांगितंल. आपल्याला एक मुलगा असून त्याला सोडू शकत नसल्याचंही त्याने तिच्याकडे स्पष्ट केलं. यावर होणाऱ्या पत्नीने आपल्याला कोणताच आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर दोघांच्या मर्जीने लग्न झालं. लग्नात दोघांच्याही कुटुंबातील लोकं सहभागी झाले होते. लग्नातील आनंदाचे क्षण कायम लक्षात राहावेत यासाठी फोटोही काढण्यात आले.
त्यानंतर पती आणि पत्नी हनीमुनला निघून गेले. हनीमूनचा पहिला दिवस दोघांनी आनंदात घालवला. पण दुसऱ्या दिवशी आक्रीत घडलं. पत्नीने पतीला लग्नाचा अल्बम दाखवला. पतीनेही मोठ्या आंनदाने अल्बम बघण्यासाठी सुरुवात केली. पण जसजसा तो एकएक फोटो पाहात होता तसतसा त्याच्या चेहऱ्यावर रागाचा पारा चढत होता. संपूर्ण अल्बम पाहून संपल्यावर मात्र त्याचा संयम सुटला आणि त्याने पत्नीवर राग काढला. या रागाचं कारण होतं संपूर्ण अल्बममध्ये त्याच्या लाडक्या लेकाचा एकही फोटो नव्हता. याबाबत त्याने पत्नीला विचारलं. मुलाचा एकही फोटो का नाही याचा जाब त्याने पत्नीला विचारला.
यावर पत्नीने दिलेलं उत्तर ऐकून पती आणकी संतापला. कारण पत्नीने अल्बममध्ये मुलाचे सर्व फोटो काढून टाकण्यास सांगितलंहोतं. अल्बममध्ये मुलाचा एकही फोटो नको असे आदेशच तिने फोटोग्राफरला दिले होते. हे उत्तर ऐकून पतीच्या संतापाचा पारा चढल आणि तिला तिथेच सोडून तो तडक घरी परतला.
पहिल्या पत्नीबाबत आणि मुलाबाबत दुसऱ्या पत्नीला सर्व माहिती देण्यात आली होती. त्यावेळी तीने कोणताही आक्षेप घेतला नसल्याचं स्पष्टीकरण पतीने दिलं. मुलाबद्दल आक्षेप आहे हे तीने लग्नाआधीच सांगितलं असतं तर दुसरं लग्नच केलं नसतं असं पतीने सांगितलं.