Ajit Pawar In Chandani Chowk Flyover Innogration History Of Chandani Chawk Flyover Name

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील चांदणी चौकाच्या (Histroy Of Pune Chandani Chowk Name) उड्डाणपुलाचं लोकार्पण (Chandani Chawk Flyover)  करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाच्या नावाचा इतिहास सांगितला. या चौकाचं खरं नाव एनडीए चौक आहे. मात्र अनेक वर्षांपासून या चौकांचा चांदणी चौक नावानंच ओळखल्या जातं. वाहतूक कोंडी आणि इतर अनेक कारणामुळे पुण्यातील हा चांदणी चौक कायम चर्चेत असतो. मात्र याचं नाव चांदणी चौक का पडलं? किंवा पुणेकर या पुलाचा उल्लेख चांदणी चौक म्हणून का करतात? या मागचा इतिहास आज अजित पवारांनी भर कार्यक्रमात सांगितला.

चांदणी चौकाचं नाव कसं पडलं?

अजित पवार म्हणाले की, चांदणी चौकाचं नाव महापालिकेच्या दफ्तरी एनडीए चौक असा आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या चौकाला चांदणी चौक म्हटलं जातं. जुनी लोक सांगतात की, या पुलावरील दगडावर चांदणी कोरलेली होती. त्यामुळे तेव्हापासून या चौकाला चांदणी चौक नाव पडलं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र काहींच्या मते, या चौकात बरेच रस्ते एकत्र येतात. यामुळे रस्त्यांची रचना गुंतागुंतीची होत असल्याने त्याला चांदणी चौक नाव पडलं असावं.

पुणेकर कोणालाच नाव ठेवायला घाबरत नाही…

अजित पवार म्हणाले की, चांदणी चौकच नाही तर पुणेकर कधीच कोणाला नावं ठेवायला घाबरत नाहीत. पुणेकरी पाट्या जगभर प्रसिद्ध आहे आणि या पाट्यांची चर्चा देशपातळीवर होते. पुणेकरांनी देवालाही नावं ठेवण्यात सोडलं नाही आहे. पुण्यातल्या देवांची नावंही अजब आहे. निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलब्या मारोती, मोदी गणपती, खुन्या मारोती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, गुडघे मोडी माता, बाजीराव मंदिर, माती गणपती, गुचूप गणपती, गुंडाचा गणपती, खुन्या मुरलीधर अशी पुण्यातल्या काही देवाची नावं आहेत. त्यामुळे पुणेकरांनी कशातच कमी नाही, असं म्हणत त्यांनी पुणेकरांचंदेखील कौतुक केलं आहे. 

…तर पुण्याची मेट्रो खचाखच भरुन नेली असती!

देवेंद्र फडणवीसांनी मेट्रो आधी पुण्याला द्यायला हवी होती. त्यानंतर नागपूरमध्ये मेट्रो न्यायला हवी होती. पुण्याची मेट्रो आम्ही खचाखच भरुन नेली असती. नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांवर पुणेकरांचं भरुपूर प्रेम आहे, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar Chandani Chowk : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं अजित पवार का म्हणाले?

[ad_2]

Related posts