( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mission Moon : मागील काही दिवसांमध्ये काही शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत आहेत. या शब्दांमध्ये चंद्र, अवकाश, चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ISRO), नासा (NASA), इस्रो आणि आता आता रशियाचाही समावेश झाला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण अवकाशाशी संबंधित घडामोडींबद्दल बोलत आहोत. अमेरिका म्हणू नका, चीन म्हणू नका किंवा मग रशिया आणि आपला भारत म्हणू नका. प्रत्येक देशातील अवकाश संशोधन संस्था चंद्र आणि त्याच्याशी निगडीत काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायसा मिळत आहे. सर्वांनाच पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहाविषयीची गूढ माहिती जाणून घ्यायचीये. यासाठी सध्या भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत असून, काही दिवसांतच ते चंद्राच्या पृष्ठावर पोहोचणार आहे.
तिथं नासानं आर्टेमिस मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पुन्हा एकदा मानवाला पाठवण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून, त्यासाठीचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. दरम्यान रशियाही या शर्यतीत मागे राहिलेलं नाही. कारण, तब्बल 47 वर्षांनंतर रशियानं चंद्रावर उतरणारं पहिलं अंतराळयान लूना 25 प्रक्षेपिक केलं आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काळात आपण आणखी काही चांद्रमोहमा राबवणार असल्याची माहितीसुद्धा रशियानं संपूर्ण जगाला दिली आहे. असंख्य प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीचे असंख्य प्रयत्न एकट्या चंद्रासाठी होत आहेत. पण, राहिला प्रश्न एकच की देशातील सर्व महत्त्वाच्या देशांना चंद्राबद्दल इतकी उत्सुकता कशासाठी लागून राहिलीये?
चंद्र आणि पृथ्वीचं नातं…
चंद्र आणि पृथ्वीचं नातं तसं संशोधकांसाछीही कुतूहलच. पृथ्वीपासून चंद्र साधारण 384400 किमी दूर असल्याचं सांगण्यात येतं. पण, हे अंतरही हवमान बदलांवर आधारित असतं. कोट्यवधी वर्षांपूर्वी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीवर आदळला. त्यातूनच धुळ आणि महाकाय शिळा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यातूनच चंद्राचा जन्म झाला. या चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांसमान असतो. इथं दिवस उगवतो तेव्हा तापमान 127 अंशांपर्यंत पोहोचतं तर, रात्री हाच आकडा उणे 173 अंशांपर्यंत जातो.
प्रश्न राहिला चंद्रावरील पाण्याचा, तर इथं पाणी आहे. इथल्या हायड्रोक्सिल अणुंबाबत भारताच्याच चांद्रयानानं त्याबाबतची उकल केली होती. असं म्हटलं जात आहे की, मंगळावर मानवाला पाठवण्याचे जे सिद्धांत मांडले जातात त्याच धर्तीवर चंद्रावरही एक लाँचपॅड असणार आहे. भविष्यात इथंच रॉकेटमध्ये इंधन भरलं जाईल आणि मग इथून ते पुढे मंगळावर पाठवले जातील. चंद्रावर हेलियम 3 सुद्धा असून, पृथ्वीवर मात्र तो फार दुर्मिळ आहे. नासाच्या निरीक्षण आणि संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रावर तब्बल 30 लाख टन इतका हेलियम 3 आगे. त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची बाब.
आता तुम्ही म्हणाल हे हेलियम प्रकरण काय? तर, युरोपातील अवकाश संशोधन संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार हेलियम 3 चा वापर अणुउर्जेमध्ये केला जाऊ शकतो. हो पण, तो रेड्ओअॅक्टीव्ह नसल्यामुळं त्यापासून धोका उदभवत नाही हेसुद्धा तितकंच खरं. अद्ययावत तंत्रज्ञान, मोबाईल, कंप्यूटर यांसारख्या उपकरणांमध्ये वापरात येणाऱ्या खनिजांचा साठाही चंद्रावर असल्याची माहिती मिळते. पण, तिथं खाणकाम करावं तरी कसं हे अद्यापही कळू शकलेलं नाही. सध्या चंद्रासंबंधिचं संशोधन प्राथमिक स्तरावर असलं तरीही त्याला बराच वेग मिळाला आहे. त्यामुळं पुढील काही वर्षांमध्ये चंद्रावरही नव्यानं मानवी वस्ती पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.