( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrayaan 3 Deboosting: भारत आता चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. दरम्यान आता Chandrayaan-3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी झाली आहे. 4 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. यानाला कक्षेत आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक धीमी प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (Perilune) 30 किमी राहील, तर सर्वात दूरचा बिंदू (Apolune) 100 किमी असणार आहे.
आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं
इस्रोने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, लँडर मॉड्यूलने यशस्वीरित्या डीबूस्टिंग ऑपरेशन केलं आहे, ज्यामुळे त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी पर्यंत कमी झाली. दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता होईल.
Chandrayaan-3 Mission:
The Lander Module (LM) health is normal.LM successfully underwent a deboosting operation that reduced its orbit to 113 km x 157 km.
The second deboosting operation is scheduled for August 20, 2023, around 0200 Hrs. IST #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/0PVxV8Gw5z
— ISRO (@isro) August 18, 2023
गुरुवारी 17 ऑगस्टला चांद्रयानच्या मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडेल) लँडर मॉड्यूल विलग करण्यात यश आलं होतं. त्यानंतर आता लँडिग मॉड्यूलचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं लक्ष 23 ऑगस्टकडे असून, याच दिवशी लँडिगची सर्वात अवघड प्रक्रिया पार पडणार आहे.
चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल.
पेरील्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर, तर अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर. परंतु इंधन, चंद्रावरील वातावरण, वेग इत्यादींवर अवलंबून या कक्षेत किरकोळ फरक असू शकतो. पण याचा मोहिमेवर काही फरक पडणार नाही. पण एकदा 30 किमी x 100 किमीची कक्षा गाठल्यानंतर इस्रोसाठीसर्वात कठीण टप्पा सुरू होईल. तो म्हणजे म्हणजे सॉफ्ट लँडिंग. 30 किमी अंतरावर आल्यानंतर विक्रम लँडरचा वेग कमी होईल. चांद्रयान-3 धीम्या गतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल. हा सर्वात कठीण टप्पा असेल.
विक्रम लँडरचं नेमकं काम काय असेल?
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं हा चांद्रयान 3 चा मुख्य उद्देश आहे. विक्रम रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर नवं संशोधन करणार आहे. त्याच वेळी, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत फिरेल आणि चंद्रावर लक्ष ठेवेल.
चंद्र पृथ्वीची अनेक रहस्ये देखील सोडवू शकतो असे अंदाज वर्तवले जात आहेत. तसंच चंद्रावरील जीवनाच्या शक्यता तपासल्या जात आहेत. चांद्रयान-3 सौरमालेतील उर्वरित अनेक रहस्ये सोडवू शकतो. चंद्राचा दक्षिणेकडील भाग हा जगासाठी अज्ञात आहे. त्यामुळे चांद्रयान-3 तिथे संशोधन करत नवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.