Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpanchami 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काल सर्प दोषामुळे आयुष्यात अनेक संकटाचा जाचकाला सामना करावा लागतो. तब्बल 24 वर्षांनंतर नागपंचमीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशात आजचा नागपंचमीच्या दिवशी कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खाली दिलेले उपाय केल्यास तुम्हाला हे दोष करण्यात मदत होईल. (nag panchami 2023 do these upay remove kaal sarp dosh in horoscope astrology in marathi )

आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. खरं तर यंदा अधिक मास आल्यामुळे नागपंचमीचा सण उशिरा आला. पण श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे हा दुर्मिळ योगामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहेत. काल सर्प दोष दूर करण्यासाठीही आजचा दिवस अतिशय शुभ असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. 

काल सर्प दोष दूर करण्यासाठी उपाय 

भोलेनाथाचा अभिषेक

कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी शंकराची पूजा आणि अभिषेक करा. त्याशिवाय महामृत्युंजय मंत्राचा जप फायदेशीर ठरेल.  नागपंचमीला हा उपाय केल्यास तुम्हाला दुप्पट लाभ होईल आणि कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. 

कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी घराच्या दारात नाग बनवून तूप अर्पण करा. त्यानंतर नागराजाच्या 12 नावांचा जप करा. अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबल, कर्कोटक, अश्वतार, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिया, तक्षक आणि पिंगल या 12 नावांचा जप केल्यास कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव संपुष्टात येईल. 

गाईच्या शेणाची पूजा

हिंदू धर्मात शेण पवित्र मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर गाईच्या शेणाने नाग तयार करा. त्याची पूजा करुन नागदेवतेचं स्मरण करा. असं केल्याने  कुंडलीतील काल सर्प दोष दूर होतो, अशी मान्यता आहे. 

चांदीचा साप

चांदीचा साप घरी आणा आणि पूजाऱ्याकडून त्याची पूजा करुन घ्या. त्यानंतर तो चांदीचा साप वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. नागपंचमीला हा उपाय केल्याने काल सर्प दोष दूर होतो. 

गायत्री मंत्राचा जप

गायत्री मंत्राला हिंदू धर्मात महामंत्र म्हटलं जातं. या शक्तिशाली मंत्राच्या जपाने सर्व संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे. काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नाग देवता आणि भोलेनाथ यांची पूजा करुन गायत्री मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts