Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे ‘या’ राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Vakri 2023 : बुद्धिमत्ता, संवाद कौशल आणि व्यवसायाचा कारक बुध उलट्या दिशेने (today budh gochar 2023) फिरणार आहे. बुध ग्रह सिंह राशीत प्रतिगामी (Mercury Retrograde 2023) होणार आहे. बुध ग्रह हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम  12 राशींवर होतो. काही राशींसाठी ग्रह गोचर सकारात्मक परिणाम घेऊन येतो तर काही राशींसाठी कठीण काळ सोबत आणतो. बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे चार राशींसाठी 15 सप्टेंबरपर्यंतचा काळ संकटांचा असणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. (budh vakri mercury retrograde in leo these zodiac signs alert till-september 15 astrology in marathi)

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध वक्री आर्थिक संकट घेऊन आलं आहे. गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होणार आहे. मुलांच्या अभ्यासावर या दिवसांमध्ये परिणाम होणार असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्या. जोडप्यांमध्ये मतभेद होऊ शकतात.  

उपाय – दररोज बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप आवश्य करा. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध गोचर संकट घेऊन येणार आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणार आहे. या राशीच्या लोकांनी कामावर लक्ष द्यायला हवं. याशिवाय तुमच्या महत्त्वाच्या गॅझेटची काळजी घ्या. या दिवसांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. 

उपाय – बुधवारी पंचधातू किंवा सोन्याची अंगठी घाला. 

सिंह (Leo)

बुध गोचर या राशींसाठीही कठीण काळ घेऊन आला आहे. सिंह राशीच्या लोकांना पचन, त्वचा किंवा घशाशी संबंधीत समस्या निर्माण होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या नाही तर तुम्ही संकटात येऊ शकता. या दिवसांमध्ये घराची स्वच्छतेकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडप्याच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. 

उपाय – रोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी चांगल ठरणार आहे.  

वृश्चिक (Scorpio)

बुध वक्रीमुळे घरातील वस्तू बिघडणार आहेत. तर तुमच्या आईच्या आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांच्या कार्यक्षेत्रात अनेक अडचणी येणार आहे. त्यामुळे मन अस्वस्थ असणार आहे. 

उपाय – कामाच्या ठिकाणी आणि घरी बुद्ध यंत्र स्थापित करणे फायद्याचं ठरणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts