Shani Gochar 2023 : शनिदेव येत्या 18 महिन्यात बक्कळ पैशासोबत देणार नशिबाला कलाटणी, ‘या’ लोकांचे सोन्याहून पिवळा सुखाचा काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात संथ गतीने आपलं स्थान बदलणारा शनिदेव येत्या दीड वर्षात काही राशींसाठी सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. न्यायदेवा किंवा कर्मदाता शनी एका राशी किमान अडीच वर्ष वास्तव करत असतो. त्यामुळे 12 राशींमध्ये त्याला संक्रमण करण्यासाठी साधारण 29.5 वर्ष लागतात. (Shani Gochar saturn transit 2023 these zodiac signs get money coming 18 months shani dev)

सध्या शनिदेव हा स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनि हा कुंभ राशीत 2025 पर्यंत विराजमान राहणार आहे. त्यामुळे पुढील 18 महिने हे काही राशींसाठी सुवर्ण दिवस घेऊन आला आहे. शनिदेव कुंभ राशीतून संक्रमण करुन नंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांवरील साडेसातीचं संकट दूर होईल. सोन्याहून पिवळा सुखाचा काळ कोणासाठी असणार हे चला जाणून घेऊयात.

मेष (Aries) 

कुंभ राशीमध्ये शनिचं स्थान मेष राशीच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. 

वृषभ (Taurus) 

कुंभ राशीमधील शनिदेवाची स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय फलदायी आहे. या लोकांना पुढील 18 महिने लाभदायक असणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यावसायिकांना फायदा होणार आहे. 

सिंह (Leo)

कुंभ राशीतील शनिदेवाची स्थिती ही सिंह राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ घेऊन आली आहे. ही लोक 2025 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करणार आहेत. तुम्हाला यशाचा मार्ग गवसणार आहे. नोकरदारांना प्रगतीसोबत यश लाभणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी पुढील 18 महिने हे वरदानापेक्षा कमी नसरणार आहेत. शनिदेवाची कुंभ राशीतील स्थिती प्रगती आणि यश घेऊन आली आहे. या लोकांना प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम दिसणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यावसायिकांना लाभ होणार आहे. लव्ह लाइफ चांगलं असणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

कुंभ राशीतील शनिदेवाची स्थिती ही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप जास्त फलदायी ठरणार आहे. यांचं नशीब 18 महिन्यात बदलणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार असून कर्जापासून ते मुक्त होणार आहे. कामात यश आणि समाजात मान सन्मान या लोकांना लाभणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्गावर तुम्ही चालणार आहात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Related posts