( प्रगत भारत । pragatbharat.com)
United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. नॅथॅनियल यांना अर्धांगवायू आहे. नॅथॅनियल या व्हीलचेअरवर आपले जीवन जगत आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून उतरताना एअरलाइनच्या कर्मचाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मदत करताना रागाच्या भरात त्याने व्हीलचेअर ढकलली. त्या घटनेनंतर मी बोलू शकत नाही आणि जेवू शकत नाही, असा दावा नॅथॅनियल यांनी केला होता. डॉक्टरांनीही नॅथॅनियल यांचे आयुर्मानही कमी झाल्याचे सांगितले होते. या सगळ्या प्रकारानंतर नॅथॅनियल यांच्या कुटुंबियांनी फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात धाव घेतली होती.
अर्धांगवायूमुळे नॅथॅनियल व्हीलचेअर, व्हेंटिलेटर आणि श्वासनलिका नलिकावर अवलंबून आहेत. 8 फेब्रुवारी 2019 रोजी, नॅथॅनियल फॉस्टर ज्युनियर आणि त्यांचे कुटुंब अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को ते मोनरो येथे गेले होते. मोनरो येथे जाण्याआधी थॅनियलच्या आईने युनायटेड एअरलाइन्सच्या हेल्प डेस्कला कॉल केला. तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आले की नॅथॅनियल यांना बोर्डिंग आणि उतरताना कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाईल. मात्र नॅथॅनियल लुईझियाना येथे आले तेव्हा सुरुवातीला फक्त एक फ्लाइट अटेंडंट त्यांना विमानातून उतरण्यास मदत करण्यासाठी उपस्थित होता. नॅथॅनियलला विमानातून बाहेर पडण्यासाठी चार ते सहा लोकांची मदत घ्यावी लागते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, नॅथॅनियलच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, नॅथॅनियलने घटनेच्या वेळी व्हीलचेअर, व्हेंटिलेटर आणि श्वासनलिका नळीचा वापर केला होता. “माझ्या व्हीलचेअरला पुढे-मागे धक्के मारण्यात आले आणि बळजबरीने खाली ढकलले गेले. त्यामुळे मी माझ्या व्हीलचेअरवरुन खाली वाकलो,” असे नॅथॅनियलच्या वकिलांनी सांगितले. या घटनेदरम्यान नॅथॅनियल घाबरला होता. त्याला श्वास घेता येत नसल्याचेही त्याने कर्मचाऱ्याला सांगितले होते. पण कर्मचारी हसला. मग विमानातील एका डॉक्टरने नॅथॅनियलला मदत केली. नॅथॅनियलला हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांनी पाहिले.
दरम्यान, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्यायालयाने एअरलाइनला पीडित नॅथॅनियलआणि तिच्या कुटुंबाला 30 दशलक्ष डॉलर रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. या दंडाची रक्कत भारतीय रुपयात किंमत सुमारे 247 कोटी रुपये आहे.