पत्नीवर ‘बेवफाई’चे आरोप करणाऱ्या आलोक मौर्याचा यूटर्न; ज्योतीवरील सर्व आरोप मागे घेतले, कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jyoti Maurya Case: उत्तर प्रदेशची पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि तिचे पती अलोक मोर्य यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मीडियासमोर आपलं रडगाणं ऐकून दाखवणारे अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न घेतला आहे. तसंच, ज्योतीवर लावण्यात आलेले सर्व आरोपही मागे घेतले आहे. अलोक मौर्यच्या निर्णयामुळं एकच चर्चा रंगली आहे. अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न का घेतला याबाबत त्यांना विचारणा होत असून त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. 

अलोक मौर्य यांना सोमवारी प्रयागराज येथील अपर आयुक्त अमृत लाल बिंद यांच्यासमोर हजर होऊन पत्नी ज्योती मौर्यविरोधात साक्ष द्यायची होती. मात्र, त्यानी याउलट करत आरोप मागे घेतले आहेत. आलोक मौर्या आयुक्त अमृत लाल बिंद यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा तासापर्यंत उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी लिखित स्वरुपात प्रार्थनापत्र देऊन आरोप पत्र मागे घेतले आहे. 

आलोक मौर्या यांनी ज्योती यांच्यावर लागलेले सर्व आरोप मागे घेतल्यानंतर त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी, मी सर्व विचार करुनच हे आरोप मागे घेतले आहेत, असं उत्तर त्यांनी दिले आहे. मात्र, कोर्टातील प्रकरण सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. ज्योतीसोबत कोर्टात जे प्रकरण आहे ते सुरूच राहणार आहे आणि कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य असेल, असं आलोक मौर्या यांनी म्हटलं आहे. 

आलोक मौर्य यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर ज्योती मौर्य यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आलोक मौर्य यांच्या या निर्णयानंतर समिती आपला अहवाल प्रयागराजच्या आयुक्तांकडे पाठवणार आहे. त्यानंतर या प्रकरणात पुढे तपास करायचा की नाही याचा निर्णय सरकार करणार आहे. 

काय आहे प्रकरण?

आलोक मौर्य यांनी काही महिन्यांपूर्वी ज्योती मौर्यवर काही गंभीर आरोप केले होते. अचानक मीडियासमोर काही कागदपत्रेदेखील दाखवले होते. तसंच, ज्योती मौर्य यांना शिकवून पीसीएस अधिकारी बनवले मात्र पद मिळताच पत्नी निघून गेली, असा आरोप आलोक मौर्य यांने केला होता.

ज्योती मौर्यवर केले होते अनेक आरोप

PCS ऑफिसर ज्योती मौर्य हिच्यापासून जीवाला धोका असल्याचा आरोपही काही महिन्यांपूर्वी आलोकने केला होता. तसे चॅटही सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकंच नव्हे तर पत्नी ज्योती मौर्याचे गाझियाबाद येथे राहणाऱ्या मनीष दुबेसोबत अफेअर आहे, असंही आलोक मौर्य यांने म्हटले होते. 

भ्रष्टाचाराचेही केले होते आरोप

आलोक मौर्य यांने ज्योतीवर भ्रष्टाचाराचेही आरोप केले होते. ज्योती पीसीएस अधिकारी होताच तिने कोटींची संपत्ती बनवली आहे. तर एकीकडे ज्योती मौर्य हिनेही आलोक मौर्यवर हुंडाबळी व घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. 

Related posts