Mumbai Pune Expressway Open For Vehicle After Block ITMS System

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास (Mumbai – Pune Expressway)  करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार होता मात्र काम लवकर संपल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खुला करण्यात आला आहे. अवघ्या 40 मिनिटांत काम पूर्ण करुन ब्लॉक संपला आहे. 

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉकदरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात आली. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत. लोणावळा एक्झिटजवळ जवळचं आजचं काम अवघ्या 40 मिनिटांत पूर्ण झालं. महामार्गावर 39 ठिकाणी 370 विविध कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी 340 कोटींचा खर्च केला जाणार आहे. द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.

ITMC प्रकल्प राबवण्यात येणार…

अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

ITMC सिस्टिम काय आहे?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. वाहनं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएससारखे सेन्सर लावले जातील. ब्लुटूथ आणि वाय-फायचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात. अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याचीही कल्पना सेन्सरमुळे मिळेल. अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल आणि तातडीची मदतही पोहोचेल.

इतर महत्वाची बातमी-

वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द, वाहन चालवल्यास दहा हजारांचा दंड

[ad_2]

Related posts