Fitness influencer Larissa Borges Dies Double Cardiac Arrest Know All About Health Problem; इतरांना फिटनेसचे सल्ले देणाऱ्या लारिसा बोर्गेसचा डबल कार्डियक अरेस्टने मृत्यू, का होतो असा त्रास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​दुसऱ्यांदा कार्डियाक अरेस्टने मृत्यू

​दुसऱ्यांदा कार्डियाक अरेस्टने मृत्यू

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, दुसरा हृदयविकाराचा झटका कशामुळे आला. जरी सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की जेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती दारूच्या नशेत होती. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
कार्डियाक अरेस्ट ही हृदयाच्या आरोग्याची गंभीर समस्या आहे जी घातक मानली जाते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचा धोका कार्डियाक अरेस्टपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. पण दुहेरी कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय आणि त्याची कारणे काय असू शकतात हे समजून घेऊ.

​डबल कार्डियाक अरेस्टची समस्या

​डबल कार्डियाक अरेस्टची समस्या

डबल कार्डियाक अरेस्ट बद्दल जाणून घेण्याआधी, कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे?
जेव्हा हृदय अचानक आणि अनपेक्षितपणे पंपिंग थांबवते तेव्हा कार्डियाक अरेस्ट येतो. या अवस्थेत मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठाही थांबतो. हृदयाच्या ठोक्यातील अनियमिततेमुळे हृदयविकाराचा त्रास होतो ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यापासून रोखता येते. दोनदा कार्डिआक अरेस्ट येण्याची कारणे काय असू शकतात, हे समजून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

​(वाचा – रिकाम्या पोटी तूप का खाऊ नये? दररोज तूप खाण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या)​

​डबल कार्डियाक अरेस्ट बद्दल जाणून घ्या

​डबल कार्डियाक अरेस्ट बद्दल जाणून घ्या

दुहेरी कार्डियाक अरेस्ट, नावाप्रमाणेच, एकामागून एक ह्रदयविकाराची समस्या आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. कार्डियाक अरेस्टमध्ये जितक्या लवकर उपचार मिळतील तितकी रुग्णाची जगण्याची शक्यता जास्त. कार्डियाक अरेस्टमध्ये रक्तप्रवाह विस्कळीत होत असल्याने अनेक अवयव निकामी होण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे त्याची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

​(वाचा – ऋजुता दिवेकर म्हणते, सूर्यनमस्कार करताना या ३ चुका टाळा, जबरदस्त फायदा होण्यासाठी ८ पोषण टिप्स फॉलो करा)

​कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी

​कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. सीएडी हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे जो प्लेक ब्लॉकेजमुळे, हृदयातील रक्तप्रवाह कमी किंवा अडथळा आणल्यामुळे कोरोनरी धमन्या अरुंद आणि घट्ट होतात.

या समस्येचे वेळेवर निदान किंवा उपचार न केल्यास, हृदय अपयश, हृदयविकाराचा झटका किंवा सीएडीमुळे हृदयाची लय विकृती होण्याचा धोका असतो, जो प्राणघातक देखील असू शकतो.

(इंग्रजीत आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts