[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pankaja Munde : मी वंचितांची लढाई लढत आहे. त्यामुळं कोणत्याही आरक्षणाला (Reservation) माझा विरोध नाही असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं. मी मराठा आरक्षणासाठीही आंदोलनं केली आहेत. आता मराठा समाजाला असुरक्षित वाटत असेल तर त्यांची आरक्षणाची मागणी रास्त असल्याचे मुंडे म्हणाल्या. तर दुसरीकडे कोणीही मराठा आरक्षणाची दिशाभूल करुन ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावू नये. आम्ही ते होऊ देणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आठ दिवसांची आपली शिवशक्ती परिक्रमा पूर्ण केली आहे. त्यानंतर या परिक्रमेची सांगता परळी शहरांमध्ये झाली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेसंदर्भामध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत देखील पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं.
मराठा आरक्षणाची मागणी रास्त
पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं. माझा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही. मी वंचितांची लढाई लढत आहे. मी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं देखील केली आहेत. आता मराठा समाजाला असुरक्षित वाटत असेल तर त्यांची आरक्षणाची मागणी रास्त आहे. त्यामुळं कोणीही मराठा आरक्षणाची दिशाभूल करु नये. तसेच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावू नये. आम्ही ते होऊ देणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
लोकांच्या भावनेमुळं मी शिवशक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मी राष्ट्रीय भूमिकेत होते. त्यानंतर महाराष्ट्रातील लोकांनी मला महाराष्ट्रात परत काम करण्यासाठी अनेक वेळा विनंती केली. मात्र, महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नसल्यामुळं मला या ठिकाणी काम करता येत नव्हतं. त्यामुळं लोकांच्या भावनेमुळं मी शिवशक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. लोकांनी या यात्रेला खूप मोठा प्रतिसाद दिल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांच्या यात्रेचा फक्त भाजपच्या नेत्यांनीच स्वागत केलं नाही तर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी देखील पंकजा मुंडे यांची यात्रा आपल्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो असेही त्या म्हणाल्या. 2019 मध्ये माझा पराभव झाल्यानंतर तो कोणीही स्वीकारला नाही. लोक माझ्याकडे बघून माझ्या पक्षाला मतदान करतात. यापुढे परळीत जर तिहेरी लढत झाली तर त्याचा फायदा आम्हालाच होईल असे पंकजा मुंडे म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कोणालाही विस्थापित करुन निवडणूक लढवणार नाही. राजकारणात मी जे बोलते ते करून दाखवते असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
Manoj Jarange Patil : गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; आज घेणार पुढचा निर्णय
[ad_2]