Asia Cup 2023 Shahnawaz Dahani And Zaman Khan Added To Pakistan Squad Know Details( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zaman Khan, Pakistan Cricket Team : आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात भारताने पाकिस्तानवर तब्बल 238 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान संघात दोन गोलंदाजांना सामील करण्यात आलेय. राखीव गोलंदाज म्हणून दोन गोलंदाजांना बोलवण्यात आलेय. हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांना भारताविरोधात दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे बॅकअप म्हणून पाकिस्तान संघात दोन गोलंदाजांना सामील करण्यात आलेय. यामध्ये डावखुरा जमन खान या गोलंदाजाचा समावेश आहे. जमान खान याच्या गोलंदाजी अॅक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 22 वर्षीय जमान खान याची अॅक्शन श्रीलंकेच्या लसीथ मलिंगा याच्यासारखी आहे. 

जमन खान याचा जन्म 10 सप्टेंबर 2001 रोजी पाकिस्तानमधील मीरपूर येथे झाला होता. जमन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भेदक मारा केला. 2021-22 मध्ये त्याला नॉर्दन संघात स्थान देण्यात आले होते. जमन अॅक्शन आणि वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. 

2022 मध्ये जमन याने लंका प्रिमिअर लीग स्पर्धेत जाफना किंग्स संघाने खरेदी केले होते. त्यानंतर मार्च 2023 मध्ये त्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 6 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. त्यामध्ये चार विकेट घेतल्या आहेत. जमन याला पाकिस्तानमध्ये काश्मिरी एक्स्प्रेस नावाने ओळखले जाते. भारताविरोधात नसीम शाह आणि हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाल्यानंतर जमन खान याला बॅकअप म्हणून संघात स्थान दिलेय. 

 

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये सुपर-4 (Super 4) सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानसमोर तब्बल 356 धावांचा डोंगर उभा करणारी भारतीय फलंदाजी श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणासमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालगे आणि चरिथ असलंका या फिरकी गोलंदाजांनी भारताला षटकांत बाद धावांत रोखलं. डावखुरा स्पिनर दुनिथ वेल्लालगेनं अवघ्या 40 धावा मोजून भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. चरिथ असलंकानं धावांत तीन विकेट्स घेऊन त्याला छान साथ दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं सलामीला 80 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ईशान किशन आणि चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. पण त्या तिघांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही. रोहित शर्मानं 53, ईशान किशननं 33 आणि लोकेश राहुलनं 39 धावांची खेळी केली. 

आणखी वाचा :
IND vs PAK Popular Memes : पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस, तुम्हीही पोट धरुन हसाल…Related posts