Surya Grahan 2023 Last solar eclipse of this year on this day See how your zodiac sign will be affected

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Surya Grahan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण हे वेळोवेळी होत असतात. प्रत्येक ग्रहणाच्या प्रभाव हा मानवी जीवनावर पडताना दिसतो. ग्रहणाचा प्रभाव काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो. दरम्यान यंदाच्या वर्षाचील शेवटचं सूर्यग्रहण शनिवार 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  

सूर्यग्रहण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊया.

काय आहे सूर्य ग्रहणाची तिथी आणि वेळ?

वैदिक पंचादानुसार, यंदाच्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:33 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण पहाटे 2:24 वाजता संपणार आहे. हा दिवस अमावस्या तिथी आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक कालावधी वैध राहणार नाही. 

कोणत्या राशींवर काय पडणार प्रभाव

मेष

ग्रहणामुळे तुमचं मन थोडं विचलित होण्याची शक्यता आहे. आजारपणामुळे अडचणी येऊ शकतात. 

वृषभ

कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. पैसे हुशारीने खर्च करा. या काळात खर्च वाढू शकतो.

मिथुन 

ग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे. जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

कर्क

ग्रहणाच्या प्रभावामुळे आरोग्य बिघडू शकणार आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सिंह

वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. एखाद्या विषयावर मानसिक अस्वस्थता असू शकते. 

कन्या 

काम आणि व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

तूळ 

राजकारणाशी संबंधित लोकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांशी कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. 

वृश्चिक

जीवनात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. काही योजना यशस्वी होऊ शकतात. परंतु वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

धनु 

हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

मकर 

बेरोजगारांना यावेळी नोकरी मिळू शकते आणि अचानक आर्थिक लाभही संभवतो. 

कुंभ 

ग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. इच्छित ठिकाणी बदली होऊ शकतात.

मीन

या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागतील. व्यवसायात चांगले यश मिळू शकेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts