up news father in law raped pregnant daughter in law at muzaffarnagar

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shocking News : गर्भवती सुनेवर (Daughter in Law) सासऱ्याने (Father in Law) अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्याने गर्भवती सुनेवर आधी बलात्कार (Raped) केला, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिथून पसार झाला. पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीन सांगितला. पण तिची मदत करण्याऐवजी पतीने तिला मारहाण केली. इतकंच नाही तर पीडितेला घराबाहेर काढलं. वडीलांनी जबरदस्तीने तुझ्याशी शारिरीक संबंध ठेवलेत आहेत, आता तू माझी पत्नी नाही, मी तुला घरात ठेऊ शकत नाही, असं पतीने पीडितेला सुनावलं. इतकंच नाही तर तू आता वडिलांची पत्नी म्हणजे माझी आई झाल्याचं त्याने दिला सांगितलं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुझफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली इथल्या ककरौली भागात पीडितेचं कुटुंब राहातं. 19 ऑगस्ट 2022 मध्ये पीडित महिलेचा विवाह मीरपूर इथल्या एका गावातील व्यक्तीशी झालं. लग्न झाल्यापासून सासऱ्याची सुनेवर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी पीडित महिलेचा पती बाहेर गेला. यावेळी पीडित महिला घरी एकटीच होती. ही संधी साधात सासऱ्याने सुनेला आधी मारहाण केली, त्यानंतर तिच्यावल बलात्कार केला. 

पीडित महिलेचा पती आजारी आईला घेऊन डॉक्टरकडे गेला होता. त्याचवेळी आरोपी सासऱ्याने हा सुनेवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी सासरा फरार झाला. 

पतीला सांगितली आपबिती
संध्याकाळच्या सुमार पती घरी परतला. यावेळी पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पण आपल्या वडिलांची पोलिसात तक्रार करण्याऐवजी पतीने पत्नीलाच मारहाण करत घराबाहेर काढलं. आता मी तुला घरात ठेऊ शकत नाही, तू वडिलांची पत्नी बनलीस असं त्याने सुनावलं.

पीडित महिलेने केली तक्रार
घरातून बाहेर काढल्यानंतर पीडित महिलेने माहेरी जात आपल्या कुटुंबियांना झालेली घटना सांगितली. झालेला प्रकार ऐकल्यावर पीडितेच्या आई-वडीलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या मदतीने पीडितीने मीरापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत पीडित महिलेचा सासरा  आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. 

याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली असून आरोपी सासऱ्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Related posts