( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shukra Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. यावेळी अनेक शुभ आणि अशुभ परिणाम पहायला मिळतात. ग्रहांच्या गोचरचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते.
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, उपभोग यांचा शुक्र ग्रह कारक आहे. ज्यावेळी शुक्राचं गोचर होतं तेव्हा ते व्यक्तीवर विशेष प्रभाव टाकतं. शुक्राला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी फक्त 25 दिवस लागतात. तो सध्या कर्क राशीत असून 2 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या राशींमध्ये बदल झाल्यामुळे या 3 राशींच्या जीवनातही सकारात्मक बदल येणार आहेत.
तूळ रास
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी मानला जातो. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर शुभ आहे. शुक्र सिंह राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांना भरूपर लाभ होणार आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
वृषभ रास
शुक्राचा हा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देणारा असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणारे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर उंची गाठतील. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे.
सिंह रास
शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यांना अपेक्षित परिणाम मिळणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. अविवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीतून मुक्त होणार आहात.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )