[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुणे विमानतळावर सोन्याची भुकटी (Pune Crime News) असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना पडकलं आहे आणि त्यांच्याकडून 33 लाख 33 हजार रुपयांची 555 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली आहे. चक्क सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून नेत असल्याने अधिकाऱ्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.
या प्रकरणी अटक केलेले दोघंही दुबईहून पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. वेळी त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. ते घाईघाईने विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. याच सगळ्या हालचाली कस्टमच्या अधिकाऱ्यांनी टिपल्या. हे सगळं लक्षात येताच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तपासणी केली असता. गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपवून ठेवल्याचं लक्षात आलं. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 33 लाख 33 हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा?
काहीच दिवसांपूर्वी दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले होते. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या त्यामुळे य़ा महिलेची कसून तपासणी करण्यात आली होती.
मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई करतात.
इतर महत्वाची बातमी-
[ad_2]