RBI Recruitment Reserv Bank Of India assistant post vacant Job News in Marathi;भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.एससी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून450 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन उमेदवारांकडून 50 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. 

उमेदवारांना त्यांच्या अनुभवानुसार 20 हजार 700 ते 52 हजार 850 पर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी द्यावी लागणार आहे.

एअर इंडियामध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत भरघोस पगाराची नोकरी

प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातील.प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकणार आहेत. 

मुख्य परीक्षेत उमेदवारांना 200 गुणांचे 200 प्रश्न असतील. ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे दिली जातील. यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, लेखी परीक्षेची गरज नाही

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 21 आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर 2 डिसेंबर 2023 रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Related posts