Horoscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope Money Weekly (18 to 24 September) : हा आठवडा म्हणजे लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2023). गणेशोत्सवाचा हा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. त्यात मंदळ अस्तमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे.  12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. (weekly money career horoscope 18 to 24 september 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy surya gochar Mangal Ast 2023 and Ganesh Chaturthi 2023) 

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे. कुटुंबाशी संबंधित आर्थिक बाबतीतही थोडे धाडस दाखवून निर्णय घेतल्यास तुम्हाला लाभ होणार आहे. हा आठवड्या प्रवासातूनही तुम्हाला लाभ होणार आहे. कार्य क्षेत्रात तुमची मेहनत यशस्वी होणार आहे. पैसे संबंधात तुमची चिंता दूर होणार आहे. तुमच्या मनाप्रमाणे कामं होणार आहे. 

शुभ दिवस: 18, 23, 24
 
वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगली बातमी कानावर पडणार आहे. कार्य क्षेत्रात तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. कौटुंबिक बाबीत तुम्हाला चिंता सतावणार आहे. प्रवासातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही काळजी घेतली तर चांगले परिणाम दिसून येतील. 

शुभ दिवस: 23, 24

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा फायदेशीर असणार आहे. प्रवासातून तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमच्या घरात नूतनीकरणाचं काम होऊ शकतं. अगदी घर सजविण्यासाठी तुम्ही खरेदी करणार आहात. कामाच्या ठिकाणी संवादातून प्रश्न सुटणार आहे. आठवडाचा शेवटी गोड होणार आहे. 

शुभ दिवस: 19, 20, 21

कर्क (Cancer Zodiac) 

आर्थिक दृष्टीकोनातून या राशीच्या लोकांसाठी आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही शब्दांवर ठाम राहा. तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रवासातून शुभ वार्ता मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

शुभ दिवस: 18, 20, 24

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड शुभ ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रेम जीवनात रोमँटिक क्षण व्यत्यत करणार आहे. कार्य क्षेत्रात काही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला हा आठवड्यात काही वेळा आळशीपणा वाटू शकतो. प्रवासात काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एकांतात वेळ घालवणार आहात. 

शुभ दिवस: 19, 21, 23

कन्या (Virgo Zodiac) 

आर्थिक दृष्टीकोनातून कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला लाभ होणार असून नवीन गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. प्रकल्पात तुम्हाला यश मिळणार आहे. नवीन ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. कुटुंबात आनंद, सौहार्द असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

शुभ दिवस: 18, 20, 21

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती जुळून येणार आहे. आर्थिक गुंतवणुकीमुळे तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. तुम्ही जितकी विचारपूर्वक गुंतवणूक कराल तितका फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. प्रवासात तुम्हाला यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

शुभ दिवस: 18,19,20

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या तब्येतीत सुधारणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. प्रवासातून नवीन ओळखा होणार आहे. सुख समृद्धीचा योग आहे. हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. 

शुभ दिवस: 19,20,21,22

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. प्रगती घेऊन आला हा आठवडा आला आहे. आर्थिक लाभ होणार आहे घरात लक्ष्मी येणार आहे. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जरा एकटं वाटणार आहे. 

शुभ दिवस: 20,21

मकर (Capricorn Zodiac)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धीची शुभ योग जुळून आले आहेत. तुमच्यापैकी काहींसाठी विवाह योग आहे. कुटुंबात जुन्या आठवणी ताज्या होणार आहे. या आठवड्यात प्रवासात सुखद अनुभव येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला हवे असलेले बदल होणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळणार आहे. 

शुभ दिवस: 18,19, 20

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात नवीन विचार किंवा सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमातून तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. या आठवड्यात खर्च जास्त होणार आहे.  तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष द्याव लागणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्याने तुम्ही दुखवणार आहात.

शुभ दिवस : 19, 20

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी सुधारणा करावी लागणार आहे. आर्थिक बाबतीतही तुम्ही कोणतेही लिखित काम काळजीपूर्वक करा. अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणामही तुम्हाला मिळणार आहे. संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला आनंदी वाटणार आहे. 

शुभ दिवस: 18,20, 22

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts