एक सीक्रेट डील अन् IMF ने पाकिस्तानला दिले 25 हजार कोटी रुपये, नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Secret Deal Between Pakistan And USA: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जामुळे अडचणीत आल्याने अमेरिकेला गुप्तपणे शस्त्र विकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुप्त देवाण घेवाणीसंदर्भातील एक अहवाल समोर आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये बिगरनफा तत्वावर चालणाऱ्या ‘इंटरसेप्ट’ या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानने गुप्तपणे अमेरिकेला शस्त्रं विकली आहेत. हिच शस्त्रं सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेनकडून वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

इस्लामाबादने अप्रत्यक्षपणे या गुप्त कराराच्या माध्यमातून युक्रेन आणि रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनचे हात बळकट केल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंटरसेप्ट’ या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानमध्ये स्फोटक शस्त्रांसाठी वापरला जाणाऱ्या दारुगोळ्याची निर्मिती केली जाते. हा दारुगोळा युद्धात वापरला जातो. युक्रेनच्या लष्कराने रशियाविरोधात वापरलेल्या शस्त्रांमध्ये पाकिस्तानात तयार करण्यात आलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे पाकिस्तानकडून अमेरिकेने थेट युक्रेनला शस्त्रं पुरवल्याचं सांगितलं जात आहे.

कधी झाला करार?

पाकिस्तानी लष्करामधील सूत्रांनी ‘इंटरसेप्ट’ या संस्थेला दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला हा सौदा झाला. या व्यवहाराची आकडेवारीही या व्यक्तीने ‘इंटरसेप्ट’ला दिली आहे. या कागदपत्रांमधील तपशीलानुसार अमेरिका आणि पाकिस्तानने 2022 च्या उन्हाळ्यापासून ते 2023 च्या हिवाळ्यापर्यंत शस्त्र पुरवण्याचा करार केला. युक्रेनवर रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये हल्ला केला. जाहीर करण्यात न आलेल्या शस्त्रसाठ्यामधून ही हत्यारं देण्यात आली. या सर्व व्यवहार स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून झाला.

कोणी केला करार?

‘इंटरसेप्ट’च्या दाव्यानुसार, ग्लोबल मिलेट्री प्रोडक्ट्सची उपकंपनी असलेल्या ग्लोबल ऑर्डिन्सच्या माध्यमातून हा व्यवहार झाला. युक्रेनमधील फारश्या चर्चेत नसलेल्या एका कंपनीबरोबर हा व्यवहार झाला अशी माहिती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे.

पाकिस्तानला मिळाले 25 हजार कोटी

या व्यवहारामधून पाकिस्तानला अमेरिकेकडून राजकीय फायदा होण्याची अपेक्षा आहे. आयएमएफकडून 3 बिलियन अमेरिकी डॉलर (300 कोटी डॉलर्स) रक्कम अमेरिकेने पाकिस्तानला दिल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच अमेरिकेने पाकिस्तानला  24,98,130,00,000 रुपये म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी रुपये दिले आहेत. 

मोठा दिलासा

पाकिस्तानला वेळोवेळी केलेल्या मदतीच्या माध्यमातून त्यांच्यावर आयएमएफचं मोठं कर्ज झालं आहे. आर्थिक चणचणीत असलेल्या पाकिस्तानला हे कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता या सिक्रेट डिलमुळे पाकिस्तानला या कर्जामधून मोठा दिलासा मिळाला आहे. 

Related posts