Iphone 15 Series First Sale Starts Today Check Out Price Details And Discount Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Series : जर तुम्हीदेखील आयफोन प्रेमी आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आयफोन प्रेमींची प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. याचं कारण म्हणजे  नुकत्याच लॉंन्च झालेल्या आयफोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे. ग्राहक आजपासून iPhone 15 सीरिज खरेदी करू शकणार आहेत. नवीन सीरिची पहिली ऑफिशियल विक्री Apple च्या अधिकृत वेबसाईट आणि स्टोअर्सवर आजपासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, ऍपल चा आयफोन 15 भारतात लॉंच झाल्यानंतर आजपासून ग्राहकाना बुकिंग केलेला फोन मिळतो आहे. यामुळे ऍपल स्टोरच्या बाहेर मोठी गर्दी दिसून येतेय. बीकेसी येथील ऍपल स्टोरबाहेर सकाळपासून रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाहीतर इतर राज्यातून ही आयफोनचे ग्राहक या स्टोअरवर आले आहेत. 

कॅमेरा आणि डिस्प्लेबाबत माहिती

आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्पे देण्यात आला आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये A16 बायोनिक चिप फिचर्स फार महत्त्वाचं आहे. यामध्ये नवीन कॅमेरा सिस्टीम देण्यात आलेली आहे. यातील नाईट मोडमध्ये नवीन अपडेट देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नवीन आयफोन 15 प्रो मध्ये यूजर्स 4K 60FPS एवढ्या हाय क्वालिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहेत.

iPhone 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, iPhone 15 Plus फोनमध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. 

टाईप-सी चार्जिंग सपोर्ट

या आयफोनमध्ये ऑल-डे बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. तसेच हे दोन्ही आयफोन यूएसबी-सी चार्जिंगला सपोर्ट करतील. यामुळे कोणत्याही टाईप-सी चार्जरने यूजर्स आयफोन चार्ज करू शकणार आहेत.

स्पेसिफिकेशन्स 

आयफोन 15 च्या दोन्ही प्रो व्हर्जन्समध्ये सर्वात थिन बेझल्स देण्यात आले आहेत. यामध्ये नवीन A17 Pro चिप असणार आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये देखील यूएसबी-सी टाईप केबल वापरता येणार आहे. यामध्ये म्युट बटणाच्या जागी नवीन अ‍ॅक्शन बटण मिळणार आहे. आयफोन 15 प्रो या फोनमध्ये 6.1 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. तर प्रो प्लस या मॉडेलमध्ये 6.7 इंच स्क्रीन मिळेल. हे आतापर्यंतचे सर्वात हलके प्रो आयफोन असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Vivo T2 Pro 5G लवकरच लॉंच होणार, ड्युअल कॅमेरा आणि LED फ्लॅश लाईट, जाणून घ्या किंमत

[ad_2]

Related posts