Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं भाकीत खरं ठरलं ते जाणून घेणार आहोत. (baba vanga predictions for 2024 list these prediction has come true in 2023 in marathi)

2023 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी 

बाबा वेंगा यांनी 2023 साठी अनेक धोकादायक आणि भीतीदायक भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातील पहिली भविष्यवाणी होती तिसरं महायुद्ध होणार आहे. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की, पृथ्वीची कक्षा बदलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2023 मध्ये काही गोष्टींचा शोध वैज्ञानिक लावणार आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार काही देश जैविक शस्त्रांनी हल्ला करणार असल्याचही त्यांनी भविष्यवाणी केली होती. त्याशिवाय भारतात अवकाळी पाऊस आणि अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, असं भाकित केलं होतं. एवंढच नाही तर 2023 हे वर्ष अंधार आणि शोकांतिकेचे वर्ष म्हणून त्यांनी उल्लेख केला होता.  

‘हे’ भाकीत ठरले खरे !

बाबा वेंगा यांनी भारतासंदर्भात केलेले भाकीत खरं ठरलं आहे. भारतात मार्च आणि एप्रिल महिन्यात तुफान पाऊस पडला. त्याशिवाय बाबा वेंगा यांचे सौर वादळाचं भाकीतही खरं ठरलं आहे. शास्त्रज्ञांनी सूर्यामध्ये पृथ्वीपेक्षा 20 पट मोठे छिद्र शोधून काढलं आहे. त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचे घातक परिणामही दिसून येत आहे. 

2024 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी

बाबा वेंगा यांनी येणाऱ्या नवीन वर्षासाठी म्हणजे 2024 साठीदेखील भाकीत केलं आहे. त्यांच्यानुसार चीन लवकरच जगाची महासत्ता बनणार आहे. चीन संपूर्ण जगात आपली ताकद दाखवून देणार आहे.  2024 मध्ये हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपामुळे पृथ्वीची स्थिती बिकट होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.  2024 मध्ये या बदलामुळे पृथ्वीच्या हवामानावर गंभीर परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे तापमानात बदल होणार असून थंड ठिकाणे गरम तर उष्ण ठिकाणे थंड होणार आहे. त्याशिवाय त्यांनी भीतीदायक भाकीत केलं आहे. 2024 मध्ये हिमनद्या वितळण्यास सुरुवात होईल त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेली शहरे पाण्याखाली जातील, असं ते म्हणाले आहेत. 

2024 पर्यंत मानवी जीवनावरही भयानक परिणाम होणार आहे.  निसर्ग आपले राक्षसी रूप 2024 मध्ये दाखविणार आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमध्ये खलिफत राज्य करणार असून 2043 पर्यंत युरोपमध्ये इस्लामिक खिलाफत पूर्णपणे स्थापित होणार आहे. येत्या वर्षभरात जगभरात गुन्हेगारीचा आलेख वाढता असणार आहे. बाबा वेंगाच्या मते, येत्या काही वर्षांत मानव शुक्र आणि बुधापर्यंत पोहोचलेला असे. 

एक दिवस या पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी नाहीशी होणार आहे, असे स्वतः शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे इतर ग्रहांवर जीवनाचा शोध सुरु असल्याचं बोलं जातं आहे. अशा परिस्थितीत मानव इतर ग्रहांवर जगण्याचा शोध घेत असून तिथे उर्जेचे नवीन स्त्रोत शोधले जात आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts