Gautami Patil On Marriage And Love Expectations Her Mother Father And History Marathi Latest News 



( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लहानपणापासून वडील सोबत नसल्याने आईनेच वडिलांचीही भूमिका पार पाडली आणि आपल्याला सांभाळलं, वाढवलं, त्यामुळे आपल्या आणि आईच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करणार असल्याचं गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) सांगितलं. आपला इतिहास स्वीकारणाऱ्या मुलासोबत लग्न करायला आवडेल असंही ती म्हणाली. गौतमी पाटीलने एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारल्या. 

Gautami Patil On Marriage : लग्नासाठी कसा मुलगा हवाय? 

लग्नाच्या विषयावर गौतमी पाटील म्हणाली की, “सध्यातरी लग्नाचा विषय नाही. आई म्हणेल त्याच वेळी आणि तिच्या-माझ्या पसंतीनेच लग्न करणार आहे. माझा इतिहास, माझ्यासोबत जे काही घडलंय हे सर्व स्वीकारून मला साथ देणाऱ्या मुलासोबत लग्न करणार.”

Gautami Patil On Mother : आईनेच सांभाळले

आईविषयी बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, “वडील दारू प्यायचे आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. त्यामुळे मग त्यांच्यापासून वेगळ राहिलो. आईचा अपघात झाल्यानंतर तिला काम करायला जमत नव्हतं, चक्कर यायची. त्यावेळी जगण्यासाठी या क्षेत्रात आली. आपल्यासाठी आईने तिचे मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं.  माझ्या आयुष्यात वडिलांची भूमिकाही आईनेच पार पाडली. त्यामुळे तिच्या आणि माझ्या पसंतीनेच लग्न करणार.”

Gautami Patil On Father : यशाचं श्रेय हे वडिलांनी केलल्या कृत्याला

आज आपण जे काही आहे ते वडिलांच्यामुळे असं सांगत गौतमी पाटील म्हणाली की, “त्या वेळी वडील तसे वागले नसते तर मी या क्षेत्रात आलीच नसते. त्यामुळे आज जे काही आहे ते त्यांच्या त्यावेळच्या कृत्यामुळेच.”

गौतमी पाटीलचे स्वप्न काय? चित्रपट स्वीकारणार का? 

आयुष्यात स्वप्न काय आहे असं विचारल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली की, मी कधीही पुढचा विचार केला नाही. पुण्यात आली त्यावेळी काही स्वप्न नव्हतं, या क्षेत्रातल आल्यानंतरही तेच झालं. फक्त एकच विचार होता की घर कसं चालणार, उद्याचं काय होईल? अजूनही तोच विचार असतो. त्यामुळे आजही पुढचा विचार करत नाही. जी ऑफर येईल ती स्वीकारते. चित्रपट मिळाला तर नक्की स्वीकारणार. 

नृत्याच्या अदा कुठे शिकल्या? 

एखाद्याच्या अंगात काहीतरी कला असते असं सांगत गौतमी पाटील म्हणाली की, या क्षेत्रात आल्यानंतर मी सगळ्या अदा शिकल्या. स्टेज हे माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की सगळं विसरून डान्स करते. समोरच्या प्रेक्षकांचा विचार करून त्याला आनंदी ठेवणं, त्याचं मनोरंजन करणं हाच उद्देश असतो. माझ्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती वाढताना दिसतेय हे माझ्यासाठी आशादायकल चित्र आहे.

ही बातमी वाचा: 

Related posts