Mangal Gochar After 9 days Mars will enter Libra sign people of this zodiac sign will get great wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal Gochar : ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह गोचर करतो. मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. जेव्हा जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो तेव्हा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होतो. 

ज्योतिष्य शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 3 ऑक्टोबर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या तूळ राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. शौर्याचा कारक असलेला मंगळ ग्रह 03 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05:12 वाजता तूळ राशीत गोचर करणार आहे. तूळ राशीतील मंगळाचं गोचर अनेक राशींसाठी खूप प्रभावशाली असणार आहे.

मेष रास

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. या राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव आहे. अशा स्थितीत जेव्हा मंगळाच्या गोचरने या लोकांना विशेष लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या काळात विशेष लाभ मिळतील.  याशिवाय श्रीमंत होण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. 

वृश्चिक रास

मंगळाच्या तूळ राशीत प्रवेशाने त्याचा शुभ प्रभाव वृश्चिक राशीवरही दिसणार आहे. या राशीच्या लोकांसाठी नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती दिसणार आहे. नोकरीत सकारात्मक बदल दिसून येतील. मंगळ देवाच्या आशीर्वादाने या काळात वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमचे उत्पन्न वाढेल. 

मकर रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो. मंगळ ग्रहाच्या कृपेमुळे या राशीचे लोक स्वतःला भाग्यवान समजतात. मंगळाच्या गोचरमुळे या काळात तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता. कामाच्या ठिकाणी अधिका-यांचे सकारात्मक सहकार्य मिळेल. या काळात मंगल देवाच्या कृपेने तुम्हाला नोकरीत बढतीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला व्यवसायात भरपूर नफाही मिळेल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts