कोसळण्याआधीच Bennu लघुग्रहाचा तुकडा NASA ने पृथ्वीवर आणला; खूप मोठा धोका टाळण्यासाठी धडपड

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OSIRIS-REx, Bennu Asteroid: 159 वर्षानंतर पृथ्वीवर  बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह कोसळणार आहे. हा लघुग्रह कोसळण्याआधीच  लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. Bennu लघुग्रह पृथ्वीसाठी धोकायक ठरू शकतो. धोका टाळण्यासाठी NASA ची धडपड सुरु आहे. 643 कोटी किमी प्रवास करून नासाचे अंतराळयान  Bennu लघुग्रहाचा तुकडा घेवून पृथ्वीवर परतले आहे. या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले. 

159 वर्षानंतर Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकणार 

24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.  यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर विनाश पृथ्वीवर होणार आहे. दरम्यान, दर 6 वर्षांनी   बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जात आहे. 

643 कोटी किमी प्रवास करून नासाचे अंतराळयान  Bennu लघुग्रहाचा तुकडा घेवून पृथ्वीवर परतले

रात्री 8:30 च्या सुमारास, अमेरिकेतील उटाहमधील ग्रेट सॉल्ट लेक वाळवंटात अंतराळातून एक कॅप्सूल आले. या कॅप्सूलमध्ये   Bennu लघुग्रहाचा तुकडा आहे.  Bennu लघुग्रह  159 वर्षांनी म्हणजे 24 सप्टेंबर 2182 रोजी पृथ्वीवर आदळू शकतो. तत्पूर्वी 643 कोटी किलोमीटरचा प्रवास करून कॅप्सूलच्या आकाराच्या अंतराळातून  Bennu लघुग्रहाचा तुकडा आणण्यात आला आहे. ही कॅप्सूल लहान फ्रीजच्या आकाराची आहे. OSIRIS-REx चे पूर्ण नाव Origins, Spectral Interpretation, Resource Identification and Security Rigolith Explorer आहे. 

नासाचे OSIRIS-REx मिशन नेमकं काय आहे?

पृथ्वीवर धडणारा लघुग्रह पृथ्वीसाठी किती धोकादायक ठरू शकतो याचा अभ्यास करमारे नासाचे हे पहिले मिशन आहे. याला  OSIRIS-REx मिशन असे नाव देण्यात आले आहे. बेन्नू लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी सात वर्षांपूर्वी मिशन लाँच करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी  Bennu लघुग्रहा नमुने गोळा केले होते. तेव्हापासून हे कॅप्सुल पृथ्वीच्या दिशेने परतत होते.

पहिल्यांदाच लघुग्रहाचा तुकडा पृथ्वीवर आणला

पहिल्यांदाच लघुग्रहाचा तुकडा पृथ्वीवर आणण्यात आला आहे. NASA ची टीम यावर काम करत होती. 45 किलो कॅप्सूलमध्ये सुमारे 250 ग्रॅम नमुना आहे. या कॅप्सुलने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा लाव्हापेक्षा दुप्पट तपमान सहन करत होते.  ते अंतराळात हायपरसोनिक वेगाने प्रवास करत पृथ्वीच्या दिशेने आले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 36 पट जास्त होता. लँडिंगवेळी याचा वेग ताशी 10 मैल होता.  म्हणजेच ताशी 16 किलोमीटर वेगाने पॅराशूटद्वारे हे कॅप्सुल पृथ्वीवर लँड करण्यात आले. नासाची रिकव्हरी टीम हेलिकॉप्टर आणि ट्रकमधून वाळवंटाकडे रवाना झाली. येथे या कॅप्सुलची रिकव्हरी करण्यात आली. 

किती धोकादायक आहे Bennu लघुग्रह

पृथ्वीवरून डायनासोर नष्ट करणाऱ्या उल्कापेक्षा Bennu लघुग्रहा 20 पट कमी रुंद आहे. Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर प्रचंड विध्वंस होईल.  जमिनीवर आदळला किंवा समुद्रात पडला तरी पृथ्वीसाठी धोकादायक ठरणार आहे. यामुळे जगभरातील अनेक प्राण्यांची लोकसंख्या नष्ट होऊ शकते. याच्या धडकेने तयार झालेले विवर सुमारे 10 किलोमीटर रुंद असेल. जेथे हा लघुग्रह कोसळेल तेथे जवळपास सुमारे 1000 किलोमीटरपर्यंत काहीही शिल्लक राहणार नाही. Bennu लघुग्रह समुद्रात पडला महाप्रलयकारी त्सुनामी येऊ शकतो. पृथ्वीवर आणलेल्या  Bennu लघुग्रहाच्या नमुन्यावरून याचा धोक्याची व्याप्ती किती असू शकते याचा अभ्यास केला जाणार आहे. पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या Bennu लघुग्रहाची दिशा बदलण्यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतात. 

Related posts