Majha Katta With Taalyogi Pandit Suresh Talwalkar Who Plays Percussion Instrument Tabla



( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  शिकवण सोपं आहे पण घडवणं कठीण आहे. वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा सेमेस्टर पूर्ण झाल्याचे म्हणतात…पण, आमच्या गुरुकुलमध्ये ती प्रक्रिया नाही. एखादा विद्यार्थी पूर्ण पारंगत झाल्याशिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होते असे आम्ही समजत नसल्याचे प्रतिपादन तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी म्हटले. व्यवसाय म्हणून तबलावादन करत नाही. उत्तम गाणं, बंदिश ऐकू येईल, याच विचारातून तबलावादन करत असल्याचे त्यांनी म्हटले. ज्येष्ठ तबला वादक पंडित सुरेश तळवळकर यांनी माझा कट्टावर संवाद साधताना तबला वादनाचे अंतरंग उलगडले. 

तबला हा पंडित सुरेश तळवळकर यांचा श्वास आहे. तबला वादनाची कला जगभरात पोहचवणे हा त्यांचा ध्यास आहे. पंडित सुरेश तळवळकर हे संगीत तज्ज्ञ, भाष्यकार म्हणून ओळखले जातात. तबला वादनाचे प्राथमिक धडे वडिलांकडून मिळाले. पुढे अनेक गुरुंकडून तबला वादनाची कला आत्मसात केली. तबला वादनात विविध प्रयोग करण्यात पंडित सुरेश तळवळकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. पंडितजी गुरू शिष्य परंपरेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा आत्मा मानतात. त्यातून त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. 

पंडित सुरेश तळवळकर यांनी म्हटले की, पखवाजानंतर तबला हे वाद्य आले. पखवाजाची भाषा तबल्याने घेतली. पण हे वाद्य कानामागून आले तिखट झाले या उक्तीप्रमाणे लोकप्रिय झाले. त्याचा वापर अधिक होत असल्याचे पंडित सुरेश तळवळकर यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतात गंभीर, तरल गायकीमध्ये तबला हवाच. ठुमरी, भावस्पर्शी गीतांमध्ये तबला महत्त्वाचा आहे. त्यातून भाव व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. तबला वादनाची भाषा ही पखवाजाची आहे. तबल्याचा प्रकार एकच आहे पण, तबल्याचे स्वर वेगवेगळे आहेत. त्याचा आवाज वेगवेगळ्या पातळीचा असतो. आवाजातील हा बदल तबल्याच्या आकारावर तोंडामुळे व्यासामुळे आवाजात बदल होतो… जेवढा तबला लहान तेवढा आवाज मोठा असतो, असेही पंडित तळवळकर यांनी सांगितले.पंडित तळवळकर यांनी सांगितले की,  जुन्या लोकांनी तबला वादनात योगदान दिले आहे… नवीन लोकही तबला वादनात योगदान देत आहेत.

परदेशी विद्यार्थ्यांना तबला वादनाचे धडे

पंडित तळवळकर यांच्या आश्रमात परदेशी विद्यार्थीदेखील तबला वादनाचे धडे गिरवतात. त्यावर त्यांनी म्हटले की, लय तालाचा विचार मोठा आहे. लय तालाचा अॅप्रोच आणि भाषा या दोन गोष्टींसाठी परदेशी विद्यार्थी तबला वादन शिकायला येतात. शिकवण सोपं आहे पण घडवणं कठीण आहे. क्लासरुम मध्ये शिकवणारा सेमीस्टर पूर्ण झाल्याचे म्हणतात. पण, आमच्या गुरुकुलमध्ये ती प्रक्रिया नसल्याचे त्यांनी म्हटले. 

व्यवसाय म्हणून तबला वादन नाही….

व्यवसाय म्हणून तबलावादन करत नसल्याचे पंडित तळवळकर यांनी म्हटले. तबला वादन करताना उत्तम गाणं, बंदिश ऐकू येईल, याच विचारातून तबलावादन करतो. त्यामुळे बिदागी किती, दाद कोण देतोय याचा फार विचार करत नाही. गायकाच्या स्वराचा तबला जवळ ठेवावा लागतो. काही गायकांना लोअर नोटचा तबला हवा असतो. तर काहींना उच्च नोटचा तबला लागतो. त्यानुसार गायक तबल्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले

Pandit Suresh Talwalkar on Majha Katta : तालयोगी पं. सुरेश तळवलकर ‘माझा कट्टा’वर | ABP Majha

 

Related posts