gujarat hooch tragedy, ४० रुपयांच्या विषारी दारुनं २८ जणांचा जीव घेतला, पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर – gujarat hooch tragedy 22 died due to drink spurious liquor in botad( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : गुजरातच्या बोताडमधील रोजिदमध्ये विषारी दारुमुळं २८ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषारी दारु पिल्यानं २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोताडमधील रोजिदमध्ये विषारी दारु ४० रुपयांना विकण्यात आली होती. ४० रुपयांमध्ये दारु छोट्या प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये देण्यात आली होती. गुजरातमध्ये या प्रकारे अवैध दारु विकली जात असल्याचं समोर आलंय.

गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित लोकांनी दारु कशी मिळवली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील याबाबत संबंधित आरोपींवर हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १४ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी रसायनामध्ये पाणी मिसळून ते प्राशन केल्याची माहिती एफएसएलच्या रिपोर्टमध्ये पुढे आलं आहे. गावातील लोकांनी दारु म्हणून जे द्रव्य पिलं त्यामध्ये ९८ टक्के मिथाईल होतं. ५० जणांवर भावनगर आणि अहमदाबाद मधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Related posts