trending news 50 year old teacher tool way minor girl studnet obscene police searching

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News : मुलीची शिकणी घेता घेता एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच (Girl Student) पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीने घरातून पळून जाताना घरातील रोख रक्कम, दागिने आणि घरातली सर्वांचे आधारकार्डही (Adhaarcard) सोबत नेले. मुलगी घरातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. शिक्षक आपल्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असून यामुळे समाजात आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोपही मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा जिल्ह्यातील ही घटना आहे. शिक्षकाचं वय 50 वर्ष असून मुलगी अल्पवयीन आहे. मुलीने घरातून कॅश, दागिने आणि सर्व कुटुंबियांचे आधारकार्ड नेल्याचा आरोप पालकांनी केलाय. शिक्षकाने मुलीची फसवणूक करुन तिला पळवल्याचाही आरोपही पालकांनी केलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक हा मुलीचा नातेवाईक आहे. पोलिसांना या दोघांचा एक अश्लील व्हिडिओ हाती लागला आहे. आरोपी शिक्षकाच्या घरातल्या हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पोलीस या व्हिडिओची तपासणी करतायत. आरोपी शिक्षक हा गावात ट्यूशन घेत होता. अल्पवयीन मुलगी या शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती. शिक्षकाने या मुलीला भूलथापा देत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानतंर तिला घेऊन तो फरार झाला. पण फरार झाल्यानंतर मुलीचे अश्लील फोटो काढून तो गावाल्या लोकंना पाठवत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. 

सेक्स्टॉर्शन प्रकरणात रेल्वे कर्मचारी अडकला
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली इथं राहाणारा हा रेल्वे कर्मचारी मुंबईतल्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये कामाला होता. फेसबुकवर त्याला एका अज्ञात मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली, कोमल शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याने स्विकारली. त्यानंतर या दोघांमध्ये फेसबुक चॅट सुरु झाला, दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटिंग सुरु झालं. एकेदिवशी मुलीने त्याला व्हिडिओ कॉल केला.

दोघांमध्ये अश्लिल प्रकार घडला, हे सर्व त्या मुलीने रेकॉर्ड केलं आणि या व्हिडिओच्या आधारावर ती मुलीने त्या रेल्वे कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या मुलीने आधी दोन लाख रुपयांची मांगणी केली. कर्ज काढून रेल्वे कर्मचाऱ्याने त्या मुलीला दोन लाख रुपये दिले. पण यानंतर तिची पैशांची मागणी वाढत गेली. हा त्रास सहन झाल्याने शेवटी या रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

Related posts