general knowledge quiz which things costs rupees 500 and we eat all life

( प्रगत भारत । pragatbharat.com)

General Knowledge Trending Quiz : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) आणि ताज्या घडामोडी (Current Affairs) माहित असणं गरजेचं आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे किंवा अन्य स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. बाजारात सामान्य ज्ञान वाढवणारी अनेक पुस्तकही उपलब्ध आहेत. परीक्षेत सामान्य ज्ञानावरच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पुढचा टप्पा गाठता येत नाही. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषयांची व्यापक समज आणि जागरूकता.  इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, राजकीय अशा चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच अनेक सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची यादी घेऊन आलो आहोत.

प्रश्न 1 – कोणत्या देशात सूर्य 76 दिवस मावळत नाही?
उत्तर 1 – नॉर्वे देशात सूर्य तब्बल 76 दिवस मावळत नाही

प्रश्न 2 – पिवळ्या रंगाची नदी कोणत्या देशात वाहते?
उत्तर 2 – चीनमध्ये असलेली हुआंग नदी पिवळ्या रंगाची नदी आहे. 

प्रश्न 3 – कोणत्या फळाच्या बिया खाल्ल्याने मांजरीचा मृत्यू होऊ शकतो?
उत्तर 3 – पपई फळाच्या बिया खाल्ल्याने मांजरीचा मृत्यू होऊ शकतो

प्रश्न 4 – भारत-पाक सीमा रेषेला काय म्हटलं जातं?
उत्तर 4 – भारत-पाक सीमा रेषेला रेडक्लिफ लाईन म्हटलं जातं.

प्रश्न 5 – भारतातल्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त जुळी मुलं आहेत?
उत्तर 5 – दक्षिणेतल्या केरळ राज्यात जुळ्या मुलांची संख्या जास्त आहे

प्रश्न 6 – जगातल्या कोणत्या झाडाला सर्वात सुंदर झाडाचा मान मिळाला आहे?
उत्तर 6 – व्हिक्टोरिया नावाचं झाड सर्वात सुंदर झाड म्हणून ओळखलं जातं. 

प्रश्न 7 – अशी कोणती वस्तू आहे, ती 500 रुपयात विकत घेतो आणि आयुष्यभर बसून खातो?
उत्तर 7 – ती वस्तू खुर्ची आहे, जी आपण पाचशे रुपयात विकत घेतो, आणि आयुष्यभर त्यावर बसून खातो.

सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी या गोष्टी करा
स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या मातृ भाषेबरोबरच राष्ट्रीय भाषा हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. दिवसाची सुरुवात मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र वाचून करावीत त्याचबरोबर बातम्या पाहाव्यत जेणेकरुन आपल्याला चालू घडमाोडीची माहिती मिळू शकते. 

Related posts