राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अतिष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची आयोजन

पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिष बारणे युवा मंच, सक्षम सोशल फाउंडेशन, मोशी यांच्या वतीने सोमवार, मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार भव्य रक्तदान शिबीर तसेच सर्व स्तरातील महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. निरनिराळ्या वर्गातील लोकांना किट वाटप. १० वी, १२ वीतील विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे.प्रत्येक रक्तदात्यास मोफ़त दहा लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रम सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता चांडाळ चौकटीच्या करामती हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related posts