[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मध
मध हा अनेक लोकांसाठी साखरेचा उत्तम पर्याय आहे, परंतु याचा अर्थ असा मुलीच नाही की स्वयंपाक करताना तुम्ही त्याचा वापर करावा. कच्च्या मधामध्ये साखर, पाणी, बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्वे सी, बी, डी, ई आणि के आणि इतर अनेक आवश्यक खनिजे असतात. मध गरम केल्याने त्याची गुणवत्ता खराब होते आणि एंजाइम कमी होतात. याव्यतिरिक्त, ते गरम करणे किंवा शिजवणे हानिकारक असू शकते कारण मध विषारी होऊ शकते आणि ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
(वाचा :- सुका-ओला खोकला व साचलेला कफ मुळापासून जाळतात हे 10 घरगुती उपाय,फुफ्फुसातील विषारी घाण गाळून फेकण्यासाठी आजच करा)
ब्रोकोली
तुम्ही ब्रोकोलीची भाजी करत असाल तर थांबा. ही गोष्ट करू नका. ब्रोकोली कच्ची खाणेच चांगले आहे, कारण ब्रोकोली शिजवल्याने व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे महत्त्वाचे घटक नष्ट होतात.
(वाचा :- Kissing Disease: डोकेदुखी आणि ताप असताना चुकूनही करू नका किस, होऊ शकतो हा भयंकर आजार, वाचण्याची शक्यताही शुन्य)
बदाम
बदाम हे सुपरफूड मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की बदाम कधीही भाजू नयेत कारण त्यामुळे त्यात असलेले हेल्दी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स खराब होतात. बदाम सेवन करून अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते रात्रभर भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी खावे.
(वाचा :- Weight Loss : फक्त 1 महिन्यात वाफ बनून उडून जाईल पोट व मांड्यांवरची हट्टी चरबी, ताबडतोब करायला घ्या हे 6 उपाय)
शिमला मिरची
शिमला मिरची एक अशी भाजी आहे की जास्त शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यात व्हिटॅमिन सी उत्तम प्रमाणात असते, जे पाण्यात विरघळणारे एक पोषक तत्व आहे, म्हणूनच उष्णतेच्या संपर्कात आल्यावर त्याची शक्ती कमी होते.
(वाचा :- What Is Disease X : WHO धोकादायक इशारा – करोनापेक्षा भयंकर आजार पाडणार मृत्यूंचा खच, काय आहे डिजीज X ची लक्षणे)
बीटरूट
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक असतात जे जास्त आचेवर शिजवल्यास नष्ट होतात. यामुळेच तज्ज्ञ हे बीटरूट कच्चे खाण्याचा किंवा त्याचा रस पिण्याचा सल्ला देतात.
(वाचा :- Diabetes: या 3 घाणेरड्या सवयींमुळे 100% होतो डायबिटीज, आजच सोडा नाहीतर औषधं, इन्सुलिन, डाएट सगळं काही आहे वाया)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]