मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा, पगार किती वाढणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Increased DA Of Central Employees by 4 Percent: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा. नरेंद्र मोदी सरकारनं दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा डीए आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार का? वाढ मिळाली तर किती मिळणार? अशा अनेक चर्चा सुरू होत्या. तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ मिळण्याची अपेक्षा होतीच. अशातच मोदी सरकारनंही 4 टक्के महागाई भत्त्याची वाढ करत दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे.

[ad_2]

Related posts