Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 19 Th October 2023 Maharashtra Marathi News



( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

विधानपरिषद आमदार अपात्रता सुनावणीसाठी दिरंगाई, ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत

आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना दोन वेळा पत्र देऊन सुद्धा आतापर्यंत कुठलीही पाऊलं उचलली नाहीत. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

दोन राज्यांचे राज्यपाल बदलले, रघुवर दास ओडिशाचे आणि इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे नवे राज्यपाल

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy) यांची त्रिपुराचे राज्यपाल (Governor Of Tripura) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासोबतच झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghubar Das) यांना ओदिशाचे राज्यपाल (Governor Of Odisha) बनवण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाने बुधवारी, 18 ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी करून या दोन राज्यांसाठी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर…

19th October In History : औरंगजेबने रायगड ताब्यात घेतला, ब्रिटिशांची अमेरिकेसमोर शरणागती; आज इतिहासात

मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या काळात मराठा साम्राज्याची पडझड व्हायला सुरूवात झाली. त्यावेळी औरंगजेबाने रायगड किल्ला ताब्यात घेतला. तर आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या सैन्याने अमेरिकन जनरल जॉर्ज वाशिग्टनच्या (George Washington) सैन्यासमोर शरणागती पत्करली. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा सविस्तर…

Gaza Hospital Attack : बायडन यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर नेत्यानाहू नरमले, 12 दिवसांनंतर गाझाला अन्न-पाण्याचा पुरवठा होणार

Israel Palestine Conflict : युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझाला मदत पाठवण्यास परवानगी दिली आहे. इजिप्तला गाझापर्यंत मानवतावादी मदत पाठवणार आहे. वाचा सविस्तर…

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11, शमीला संधी मिळणार? अश्विन की शार्दूल, कोण मैदानात उतरणार?

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने-सामने येणार आहेत. यंदा टीम इंडिया दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल, जाणून घ्या. वाचा सविस्तर…

India vs Bangaladesh Match Weather Forecast : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये आज यजमान भारताचा मुकाबला बांगलादेश (IND va BAN) संघासोबत होणार आहे. पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिअशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) मध्ये या सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Today Rain Prediction) आहे का आणि आज पुण्यातील हवामान (Weather Forecast) कसं असेल जाणून घ्या. वाचा सविस्तर…

Navratri 2023 : आज देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा, कसे आहे देवीचे रुप? स्कंद कोण आहेत? आख्यायिका जाणून घ्या

Navratri 5th day Puja 2023 Devi Skandmata : नवरात्रीच्या (Navratri 2023) पाचव्या दिवशी देवीच्या स्कंदमाता (Goddess Skandmata) रूपाची पूजा केली जाते. हा दिवस ललिता पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी कुमारिका पूजन केल्याने साक्षात देवीच्या पूजेचे पुण्य मिळते. देवीच्या स्कंदमाता रुपाची काय आहे आख्यायिका. वाचा सविस्तर…

Horoscope Today 19 October 2023: मिथुन, कर्क, तूळ, कुंभ राशींसाठी आजचा गुरूवार लाभदायक! 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 19 October 2023: मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? आज व्यवसायात कोणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर…

Related posts