( प्रगत भारत । pragatbharat.com)
Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: सूर्य कोणत्याही राशीत महिनाभर राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजा सूर्य देवाने 18 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळू सूर्य 17 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात नीच भांग राजयोग तयार झाला आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना भरपूर लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.
कन्या रास
सूर्याचे गोचर आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती या राशींच्या व्यक्तींसाठी भाग्यवान ठरू शकते. त्यांना अनपेक्षित संपत्ती मिळू शकते. या काळात तुम्हाला पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांचे लाभ होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी काळ चांगला राहील. व्यवसायात दुप्पट फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील.
मकर रास
सूर्याचे गोचर आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती ही वरदानापेक्षा कमी नाही. बेरोजगारांसाठी हा काळ उत्तम राहील, त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील, लाभाच्या अनेक संधी मिळतील. एखादा मोठा व्यापार करार होऊ शकतो. नवीन नोकरी, बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकेल.
कर्क रास
सूर्य देवाचा तूळ राशीत प्रवेश आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगले राहील. लव्ह लाईफसाठी काळ अनुकूल राहील. अपत्य होण्याचीही शक्यता असते. प्रलंबित कामांना गती मिळू शकेल.आर्थिक स्थिती सुधारेल. वाहनं आणि मालमत्ता खरेदी करू शकतात.
धनु रास
सूर्याचे गोचर आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरी आणि व्यवसायात अनेक नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला धार्मिक प्रवासाला जाण्याचीही संधी मिळू शकते. प्रचंड आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )