Israel-Hamas War And India Reaction Says Aid To Palestinians Must Continue Women And Children Must Be Protected UN Security Council

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

संयुक्त राष्ट्र : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर (Israel-Hamas War and India Reaction) भारताने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी (डीपीआर) राजदूत आर. बुधवारी (25 ऑक्टोबर) रवींद्र म्हणाले की, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मृत्यूबद्दल भारत चिंतेत आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘पॅलेस्टिनी प्रश्नासह मध्य पूर्वेतील परिस्थिती’ या विषयावरील खुल्या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व करताना रवींद्र यांनी हे विधान केले. ते पुढे म्हणाले की, “इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक होता आणि आम्ही त्यांचा निःसंदिग्धपणे निषेध करतो. आमचे पंतप्रधान प्राणहानीबद्दल शोक व्यक्त करणारे आणि निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते.”

‘महिला आणि मुलांचे संरक्षण झाले पाहिजे’

रवींद्र पुढे म्हणाले की, “जेव्हा इस्रायलला या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागते, तेव्हा या संकटाच्या वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत. सध्याच्या संघर्षातील नागरिकांचा मृत्यू ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, विशेषतः महिला आणि मुलं, नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे.

‘पॅलेस्टिनींना मदत करत राहू’

आर. रवींद्र यांनी आपल्या भाषणात इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा पट्टीतील नागरिकांना मानवतावादी मदत पाठविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना देखील अधोरेखित केले.

ते म्हणाले की, “या भागात 38 टन अन्न आणि महत्त्वपूर्ण वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत. भारताने नेहमीच इस्रायल-पॅलेस्टाईनचा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची भाषा केली आहे. आम्ही आमच्या द्विपक्षीय विकास भागीदारीद्वारे पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत आहोत, ज्यात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. भारत या आव्हानात्मक काळात पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील. दोन्ही देशांमधील वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर न्याय्य, शांततापूर्ण आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

गाझापट्टीत मानवी हक्कांचे उल्लंघन

दुसरीकडे,हमासकडून इस्त्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत अक्षरश: रक्ताची होळी सुरु आहे. गाझापट्टीत आक्रोश सुरु असल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी (United Nations chief Antonio Guterres) गाझामध्ये पुन्हा युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमास यांच्यातील युद्धात आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इस्रायलने गाझापट्टीतील 23 लाख रहिवाशांना पाणी, अन्न, इंधन आणि वीजपुरवठा बंद केला, या कृतीला संयुक्त राष्ट्राने सामूहिक शिक्षेचे स्वरूप म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts